साताराः दक्षिण मांड नदी तब्बल दहा महिन्यानंतर पुन्हा लागली वाहू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

कऱ्हाड (सातारा): तालुक्याच्या दक्षिण भागात चार दिवसापासून झालेल्या पावसाने दक्षिण मांड नदी तब्बल दहा महिन्यानंतर पुन्हा वाहू लागली आहे. संपूर्ण उन्हाळभर मागणी करूनही वारणेच्या पाण्याचा एक थेंबही भागापर्यंत आला नाही. मात्र, नदी भरून वाहू लागल्याने निसर्गाने परीसराला साथ दिली आहे.

दक्षिण भागाच्या काले नांदगाव, ओंड, मनव, खुडेवाडी, वाठार, जुजारवाडी भागातील शेतीला पुरक असलेल्या दक्षिण मांड नदीला मागील वर्षाच्या सप्टेंबर महिन्यापासून पाण्याचा एक थेंबही वाहत नव्हता. नदीचे पात्र पुर्णपणे कोरडे होते. त्यामुळे उन्हाळ्यात परीसरातील पाण्याअभावी पीके होरपळली होती. त्यावेळी भागातील शेतकऱ्यांनी वारणा नदीचे पाणी सोडावे अशी मागणी केली होती. मात्र, त्याकडे शासकीय पातळीवर दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग झाला. त्यामुळे पाण्याचा उपलब्धतेनुसार पीकांचे नियोजन केले गेले. मात्र, येथील भागात चार दिवसाच्या पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसले. पावसामुळे तब्बल दहा महिन्यापासून कोरडीच असलेली दक्षिण मांड नदी वाहू लागली असून, या भागाला यंदा निर्सगानेच तारले आहे. यंदा समाधान कारक पाऊस पडेल असेच वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी शेतीच्या कामासाठी सुखावला आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Web Title: satara news karad rain and mand river