शिवसेनेचा अल्टीमेटम हा 'जोक'च- सुप्रिया सुळे

सचिन शिंदे
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

जागर युवा संवाद कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रश्‍न जाणून घेता येत आहेत.
- सुप्रिया सुळे

कऱ्हाड : सत्ता न सोडवणाऱ्या शिवसेनेचा अल्टीमेटम म्हणजे जोक झाला असल्याची खिल्ली राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना उडवली.

खासदार सुळे युवा संवाद यात्रेनिमित्त येथे आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने आदी उपस्थित होते. 

खासदार सुळे म्हणाल्या, शिवसेनेला सत्त सोडवत नाही. त्यामुळे सातत्याने देत असलेला अल्टमेटम जोक हाेऊन बसला आहे. शासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे सध्या राज्यात भारनियमन सुरू आहेत. एक महिन्याचा काेळसा शिल्लक असतानाच त्याचे नियोजन करणे गरजेचे होते, मात्र त्याची वेळीच दक्षता घेतली गेली नाही. शिक्षणाबाबतही राज्यात दररोजन नवीन परिपत्रक निघत असल्याने शिक्षझाचीही गोंधळलेली परिस्थिती आहे. यापूर्वी असे कधीही घडले नव्हते.

कर्जमाफीबाबतही रोज नवे परिपत्रक निघत आहे, सहाजिकच विद्यार्थ्यार् कर्जमाफीबद्दल तीव्र भावना आहेत. इंधनदरवाढ, महागाई याविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू राहणार अाहे. जागर युवा संवाद कार्यक्रमास चांगली प्रतिसाद मिळत असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रश्‍न जाणून घेता येत आहेत. यातून समोर येणारे प्रश्‍न मुख्यमंत्र्यांसमोर मांडले जाणार आहेत. त्यासाठी त्याची सोमवारची वेळही मागितली आहे. मात्र ते नसल्यानदाचित पुढच्या आठवड्यात त्यांना भेटून ते प्रश्‍न मांडले जातील. 

Web Title: satara news karad supriya sule on shiv sena ultimatum to bjp