खाशाबा जाधव यांच्या क्रीडा संकुलासाठी 95 गुंठे जागा हस्तांतरीत

अमोल जाधव
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

रेठरे बुद्रूक (ता. कऱ्हाड, जि. सातारा): गोळेश्वर येथे आज (गुरुवार) झालेल्या ग्रामसभेत ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या नियोजीत क्रीडा संकुलासाठी ग्रामपंचायत मालकीची 95 गुंठे जागा हस्तांतरीत करताना कायदेशीर बाबींचा अभ्यास व वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेण्याचे बहुमताने ठरले.

रेठरे बुद्रूक (ता. कऱ्हाड, जि. सातारा): गोळेश्वर येथे आज (गुरुवार) झालेल्या ग्रामसभेत ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या नियोजीत क्रीडा संकुलासाठी ग्रामपंचायत मालकीची 95 गुंठे जागा हस्तांतरीत करताना कायदेशीर बाबींचा अभ्यास व वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेण्याचे बहुमताने ठरले.

सरपंच सौ. राणी जाधव अध्यक्षस्थानी होत्या. उपसरपंच प्रदिप जाधव, ग्रामविकास अधिकारी विकास जगताप, खाशाबा जाधव यांचे चिरंजीव रणजीत जाधव उपस्थीत होते. सुमारे दिडशेहून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. प्रारंभी ग्रामविकास अधिकारी विकास जगताप यांनी नोटीस वाचले. त्यानंतर सभेपुढील खाशाबा जाधव यांच्या नियोजीत क्रीडा संकुलास ग्रामपंचायत मालकीची 95 गुंठे जागा हस्तांतरीत करणयाचा विषय विचार विनिमयास सुरुवात झाली. त्यावेळेस उपस्थित ग्रामस्थांनी चर्चेत सहभागी होत अनेक बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. सुमारे दीड तास या विषयावर ग्रामस्थ व पदाधिकाऱयांमध्ये उहापोह झाला. त्यानंतर सरतेशेवटी सदरची जागा क्रीडा संकुलास देताना कायदेशीर बाबींचा अभ्यास करणे व वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेवून ग्रामपंचायतीकडून संकुलास हस्तांतरीत करण्याचे बहुमताने ठरले. त्यानंतर तशा पध्दतीचा ठराव करण्याचे जाहीर झाल्यानंतर सभेचे कामकाज संपले.

विकास जगताप यांनी आभार मानले. क्रीडा संकुलासाठी राज्य शासनाने 4 कोटी 58 लाख रुपये इतका भरघोस निधी मंजूर केला आहे. त्याबाबत मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारीने लक्ष दिल्यामुळे क्रीडामंत्री ना. विनोद तावडे यांनी खाशाबा जाधव क्रीडा संकुलास निधी मंजूर केल्याचे मागील पंधरा दिवसापूर्वी जाहीर केले आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
'प्रायव्हसी' हा मूलभूत अधिकार, जीवनाचा अविभाज्य घटक- सर्वोच्च न्यायालय
मोहर्रम असल्याने दुर्गा विसर्जनास परवानगी नाही: ममता बॅनर्जी
गौराईचं कौतुकच न्यारं... गौरी गणपतीच्या गाण्यांचा खजिना
ज्येष्ठांच्या पुढाकाराने सरला शिवारातला दुष्काळ
परभणी: कर्जाच्या विवंचनेतून शेतकर्‍याची अात्महत्या
सर केले तीन गड
तांदूळ, तीळ, मोहरीवर लिहिले सात ग्रंथ
कऱ्हाड: अठरा नख्यांचे कासव आढळले मृत अवस्थेत
बीड: चोरट्यांनी फोडली पोलिस ठाण्याजवळील सहा दुकाने
आजही 'ती' पुन्हा बिघडली; मेढा आगाराचा भोंगळ कारभार
प्लांट टिशू कल्चर लॅब’ सुरू होण्यापूर्वीच रद्द
ग्रामपंचायत करणार रस्त्यावर फलक लावून दारू विक्री
गवताचा बाप्पा आशीर्वादासाठी सज्ज! 

Web Title: satara news khashaba jadhav Sports complex land