साताऱ्यात तीन आंदोलनकर्ते ताब्यात; दैनंदिन जीवन विस्कळीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

सातारा ः कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ सातारा जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा, शाळा, महाविद्यालय, वाहतुक सेवा बंद ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्‍यांच्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केला तसेच गावागावांत मोर्चा काढून घटनेचा निषेध नोंदविला जात होता. सातारा शहरात रिक्षावर दगडफेकीचा प्रकार घडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तीन आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

आज (बुधवार) सकाळपासून मुख्य बाजारपेठेसह अंतर्गत रस्त्यावरील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. बाहेरील आगारातून आलेल्या बसेसही सातारा स्थानकांतच मुक्कामी थांबल्या होत्या. करंजे चौकात आंदोलकांनी रिक्षा वाहतूक रोखली व काच फोडली. या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सातारा शहर व परिसरात आंदोलनकर्ते दुचाकीवरून फिरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय, दलितांवर होणार अन्याय सहन करणार नाही, अशा घोषणा देत होते. जिल्ह्यातील शिवथर (सातारा) फलटण, कऱ्हाड, कुडाळ व मेढा (जावली), मलवडी (माण) आदी गावांतही आंदोलनकर्त्यांनी मोर्चे काढले. दरम्यान, बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्वत: पोलिस अधीक्षक संदीप पाटील कंट्रोलरूमसह सर्व ठिकाणी जाऊन लक्ष ठेऊन होते.

Web Title: satara news koregaon bhima issue and satara bandh