कोयना धरणाचे दरवाजे अर्धा फुटावर

सचिन शिंदे
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

कऱ्हाड - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती दिली आहे. पाणसाठा नियंत्रणात आल्याने शनिवारी दुपारी सव्वातीन वाजता दीड फुटावरील दरवाजे अर्ध्या फुटावर आणले. धरणात १०४.६० टीएमसी पाणीसाठा आहे. कोयना नदीपात्रात पायथा वीजगृह व सहा वक्र दरवाज्यातून  सहा हजार ८१० क्युसेक पाणी विसर्ग होत आहे.

दरवाजे अर्धा फुट केले आहेत.पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे. येथे आज दिवसभर पावसाने विश्रांती घेतली आहे. दरवाजे अडीच फुटावरुन दरवाजे दीड फुटावर आणले होते. पाण्याची आवक कमी झाल्याने दुपारी सव्वातीन वाजता दीड फुटावरील दरवाजे अर्ध्या फुटावर आणले आहेत. पायथा वीजगृहातून दोन हजार १०० व वक्र दरवाजातुन चार हजार ७०० असा एकुण सहा हजार ८१० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला आहे.

कोयना धरणाची पाणी पातळी २१६३ फुट आहो. पाणी साठा १०४.६० टीएमसी आहे. चोवीस तासात कोयनानगरला पाच (४४५३), नवजाला सात (५४०६) व महाबळेश्र्वरला एक (४५२२) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. प्रतिसेकंद १८ हजार १५२ क्युसेक्स पाण्याची आवक जलाशयात होत आहे.

Web Title: satara news koyan dam water level