कोयना धरणाच्या साठ्यात 3.88 टीएमसीने वाढ

सचिन शिंदे
गुरुवार, 20 जुलै 2017

कोयना धरणाचा आजचा पाणीसाठा ५९.६२ टीएमसी आहे. काल ५५.०८ पाणीसाठा होता. धरणातील आजची पाण्याची पातळी २१११.०२ फूट झाली आहे.

कऱ्हाड : कोयना धरणात मागील चोवीस तासात ३.८८ टीएमसीने वाढ झाली.

धरणाच्या कॅचमेंट क्षेत्रात आजअखेर दोन हजार ४०७, नवजामध्ये दोन हजार ८४८ तर महाबळेश्वरला दोन हजार २६५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. चोवीस तासात कऱ्हाड, पाटण तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पावसाने नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली.

कोयना धरणाचा आजचा पाणीसाठा ५९.६२ टीएमसी आहे. काल ५५.०८ पाणीसाठा होता. धरणातील आजची पाण्याची पातळी २१११.०२ फूट झाली आहे. कालपासून कोयना भागात २३७ मिलीमीटर, नवजाला ३२६ तर महाबळेश्वरला १७० मिलीमीटर पाऊस झाला आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Web Title: Satara news Koyna dam rain water increased