कोयना धरण परिसरात पावसाचा जोर ओसरला

सचिन शिंदे
गुरुवार, 27 जुलै 2017

धरणाच्या पाण्याची पातळी दोन फुटाने वाढली आहे.  कोयना धरणात ७९.११ टीएमसी आहे. चोवीस तासात कोयनेला  ३३ (३०२०) मिलीमीटर, नवजाला २६ (३३१९) व महाबळेश्र्वरला २८ (२८५५) पावसाची नोंद झाली. कोयना धरणाची एकुण पाणीपातळीत दोन फुटाने वाढ झाली आहे.

कऱ्हाड : कोयना धरण परिसरात पावसाचा जोर ओसरला आहे. चोवीस तासात कोयना धरणाच्या पाणी साठ्यात 1.11 टीएमसीने वाढ झाली आहे.

धरणाच्या पाण्याची पातळी दोन फुटाने वाढली आहे.  कोयना धरणात ७९.११ टीएमसी आहे. चोवीस तासात कोयनेला  ३३ (३०२०) मिलीमीटर, नवजाला २६ (३३१९) व महाबळेश्र्वरला २८ (२८५५) पावसाची नोंद झाली. कोयना धरणाची एकुण पाणीपातळीत दोन फुटाने वाढ झाली आहे.

आज कोयना धरणाची पाणी पातळी २१४० फुट झाली आहे. कोयना जलाशयात पाण्याची आवक सुरूच आहे. कोयना झरण परिसरात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे त्या परिसरातील निसर्गाचा अनुभूती घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. धबधब्या भोवती लोक गर्दी करू लागले आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: Satara news Koyna dam rainfall