कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला

सचिन शिंदे
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

चोवीस तासात कोयनानगरला २७ (३३२७), नवजाला १८ (३६६२) व महाबळेश्र्वरला २१ (३१२७) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणाची पाणी पातळी २१४६.०१ फुट झाली आहे. धरणाचा पाणी साठा ८४.४० टिएमसी आहे.

कऱ्हाड : कोयना पाणलोट क्षेत्रात पावासाचा जोर ओसरला असला तरी चोवीस तासात धरणात ०.६० टीएमसी पाण्याची आवक वाढली आहे.

आज धरणात ८४.४० टीएमसी पाणी साठा आहे. रविवार पासून पावसाचा जोर कमी झाला आहे. धरणात येणारी पाण्याची आवक कमी झाली. त्यामुळे धरणाचे वक्र दरवाजे बंद करण्यात आले. पायथा वीज गृहातुन सोडण्यात येणारे दोन हजार २९८ क्युसेक पाणीही सोडण् धरण व्यवस्थापण विभागाने बंद केले आहे.

चोवीस तासात कोयनानगरला २७ (३३२७), नवजाला १८ (३६६२) व महाबळेश्र्वरला २१ (३१२७) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणाची पाणी पातळी २१४६.०१ फुट झाली आहे. धरणाचा पाणी साठा ८४.४० टिएमसी आहे. कोयना जलाशयात प्रतिसेकंद नऊ हजार २९८ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.

Web Title: satara news koyna dam rainfall