कोयना परिसरात मुसळधार पाऊस; पाणीसाठ्यात वाढ

सचिन शिंदे
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

कऱ्हाड (सातारा): कोयना परिसरात सोमवार (ता. 28) रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाणी साठ्यात ३.५६ टिएमसीने वाढ झाली. काल दिवसभर चांगला पाऊस झाल्याने धरणाच्या पाण्याची उंची तब्बल दोन फुटाने वाढली. परवापेक्षा कोयनेला १२५, नवजाला १५० तर महाबळेश्नरला ८३ मिलीमीटर जास्त झाला आहे. त्यामुळे चोवीस तासात कोयनेने ९५ टिएमसीचा टप्पा ओलांडला आहे.

आजही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळ पासून पावसाची रिमझीम सुरू आहे. कालच्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाची पाणी पातळी ९५.५७ टिएमसी झाली आहे. काल ती ९२.९१ होती. धरणाची पाण्याची पातळी २१५५.११ फुट आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात तीन दिवसात सरासरी १५० मिलीमीटर पाऊस होत आहे चोवीस तासात कोयनानगरला १४५ (३९३४), नवजाला २०६ (४६२८) आणि महाबळेश्र्वरला १३४ (३८९८) मिलीमीटर पावसाची नोंद झाली. धरणात दहा हजार ७८४ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. पायथा वीजगृहातुन कोयना नदी पात्रात पाण्याचा एक हजार २८ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

Web Title: satara news koyna dam water and heavy rain