कोयना धरणाच्या पाणी साठ्यात 24 तासांत २.८८ टीएमसीने वाढ

सचिन शिंदे 
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

कोयनेने ९८ टीएमसीचा टप्पा ओलांडला आहे.

कऱ्हाड : कोयना धरणाच्या पाणी साठ्याने ९८ टीएमसीची मर्यादा ओलांडली आहे. चोवीस तासांत धरणाच्या पाणी साठ्यात २.८८ टीएमसीने वाढ झाली आहे. धरणाची पाणी पातळी २.१९ फुटाने वाढली आहे. त्यामुळे धरण व्यवस्थापनाची एक सप्टेंबरची निर्धारीत जलपातळी शंभर टीएमसी गाठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे झाल्यास यंदा दुसऱ्यांदा धरणातून पाणी सोडले जाईल, असे धरण व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे.

दोन परिसरात दिवसा पासून परिसरात मुसळधार पाऊस झाला. काल त्याचा जोर कमी होता. मात्र रिमझीम सुरूच होती. त्यामुळे चोवीस तासात कोयनेने ९८ टीएमसीचा टप्पा ओलांडला आहे. आजही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळ पासून पावसाची रिमझीम सुरू आहे. कोयना धरणाची पाणी पातळी ९८.३५  टीएमसी झाली आहे. धरणाच्या  पाण्याची पातळी २.९१ फुटाने वाढली आहे. ती २१५८.०२ फुट आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात तीन दिवसात सरासरी १५० मिलीमीटर पाऊस होत आहे चोवीस तासात कोयनानगरल २५ (३९५९), नवजाला ५७ (४६८५) आणि महाबळेश्र्वरला ८६ (३९८१) मिलीमीटर पावसाची नोंद झाली. धरणात दहा हजार ७८४ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. पायथा वीजगृहातुन कोयना नदी पात्रात पाण्याचा एक हजार २८ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
व्हॉट्‌सऍप कॉलवरून बोलताना त्याने मरणाला कवटाळले 
नदीकाठच्या रस्त्याबाबत सुळे-आयुक्त चर्चा 
केशरी शिधापत्रिका होताहेत पिवळ्या; सरकारी योजना लाटण्यासाठी काळबाजार
रस्ते कामाबाबत चीनचे "गोलमाल'
कांद्याच्या भावाला लगाम बसणार
पावसामुळे रेल्वे, बस सेवा विस्कळित 
प्लॅस्टिक नष्ट करण्यासाठी उपाययोजना कराव्यात
उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानवरून झेपावले
मुसळधार पावसाने मुंबईत वाहतूक कोंडी 
'मंथन'ने घडवले मोहक नृत्यदर्शन 

Web Title: satara news koyna dam water lever