कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडले

सचिन शिंदे
रविवार, 30 जुलै 2017

पावसामुळे कालपासून पायथा वीज गृहातून वीज निर्मीतीही सुरू करण्यात आली आहे त्यामुळे तेथून दोन हजार १११ क्युसेक्स पाण्याचा विसर्गास सुरुवात झाली आहे. चोवीस तासात कोयना धरणातील पाणीसाठा ८२.३८ टीएमसी झाला आहे.

कऱ्हाड : कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे आज (रविवार) उघडण्यात आले. दोन फुटाने उघडलेल्या दरवाजातून दहा हजार २७५ क्युसेक पाण्याचा विसर्गास सुरुवात झाली आहे.

पाटणसह कऱ्हाड तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अवघ्या दोन महिन्यात सुमारे नऊ हजार ३९१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. ते विक्रमी नोंद आहे. त्यामुळे कोयना धरणाचे दरवाजे कोयना धरण व्यवस्थापनाच्या निर्धारीत वेळेपेक्षा एक दिवस आधीच उघडावे लागले. पावसामुळे कालपासून पायथा वीज गृहातून वीज निर्मीतीही सुरू करण्यात आली आहे.  

चोवीस तासात कोयना धरणातील पाणीसाठा ८२.३८ टीएमसी झाला आहे. सहा वक्र दरवाजातून आज दोन फुट दरवाजे उघडण्यात येणार आहेत. त्यातून दहा हजार २७५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होणार आहे.

पावसामुळे कालपासून पायथा वीज गृहातून वीज निर्मीतीही सुरू करण्यात आली आहे त्यामुळे तेथून दोन हजार १११ क्युसेक्स पाण्याचा विसर्गास सुरुवात झाली आहे. चोवीस तासात कोयना धरणातील पाणीसाठा ८२.३८ टीएमसी झाला आहे. सहा वक्र दरवाजातून आज दोन फुट दरवाजे उघडण्यात येणार आहेत. त्यातून दहा हजार २७५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होणार आहे. कोयनेत मागील वर्षाच्या तुलनेत यंदा २५ टीएमसी जादा पाणी साठा जादा आहे. मागील वर्षी ५७.३५ टीएमसी पाणीसाठा होता. तर दरवाजे ७ ऑगस्टला उघडण्यात आले होते. मात्र यंदा जुलै महिन्यातच कोयनेने प्रथमच ८० टीएमसीचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे कोयना धरण व्यवस्थापनाने पायथा वीज गृहातून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Satara news Koyna dam water released