कोयना धरणातील पाणीसाठा 70 टक्क्यांवर

सचिन शिंदे
सोमवार, 24 जुलै 2017

कोयनानगरला ९६ (२८३५) मिलीमीटर, नवजाला ३८ (३१५३) व महाबळेश्वरला १०१ (२६८४) पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणाची पाणीपातळी २१३३.७ फुट आहे.

कऱ्हाड : पाटणच्या भागात पडणाऱ्या संततधार पावसाने रविवारीच कोयना धरणाने सत्तरीचा टप्पा ओलांडला.

चोवीस तासात झालेल्या पावसाने कोयना धरणाच्या पाणी साठात १.८६ टीएमसीने वाढ झाली. आज कोयना धरणात ७३.२६ टीएमसी पाणी साठा झाला आहे. कोयना भागात कालपासून पुन्हा पावसाची रिपरिप सुरु झाली.

दिवसभर संततधार सातत्याने सुरु होती. कोयनानगरला ९६ (२८३५) मिलीमीटर, नवजाला ३८ (३१५३) व महाबळेश्वरला १०१ (२६८४) पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणाची पाणीपातळी २१३३.७ फुट आहे. कोयना जलाशयात प्रतिसेकंद ३२ हजार ३०९ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: Satara news Koyna Dam water storage