कोयना धरणातून 2100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग

सचिन शिंदे
शनिवार, 29 जुलै 2017

पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पुन्हा दमदार आगमन झाले. त्यामुळे रात्री कोयना धरणाने ८१.२३ टीएमसी पाणीसाठ्याचा टप्पा ओलांडला. कोयना धरण व्यवस्थापणाने सहा वक्र दरवाजे उघडण्यासाठी निर्धारीत केलेल्या एक ऑगस्ट तारखेच्या एक दिवस आधीच दरवाजे उघडले जाणार आहेत.

कऱ्हाड : कोयना धरण जलाशयातील निर्धारीत जलपातळी राखण्यासाठी आज सकाळी आठ वाजल्यापासून पायथा वीज गृहातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. दोन हजार 100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग येथून होत आहे. पायथा वीज गृहातून वीज निर्मीतीसही प्रारंभ झाला असून 0.9 मिलीनीयम युनूट वीज येथून तयार होत आहे. कोयनेचे सहा वक्र दरवाजे दोन फुटाने उद्या सकाळी अकरा वाजता उघडण्यात येणार आहेत.

पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पुन्हा दमदार आगमन झाले. त्यामुळे रात्री कोयना धरणाने ८१.२३ टीएमसी पाणीसाठ्याचा टप्पा ओलांडला. कोयना धरण व्यवस्थापणाने सहा वक्र दरवाजे उघडण्यासाठी निर्धारीत केलेल्या एक ऑगस्ट तारखेच्या एक दिवस आधीच दरवाजे उघडले जाणार आहेत. त्यासाठी आवश्यक असणारी निर्धारीत जलपातळी दोन दिवस आगोदर पुर्ण झाली आहे. त्यामुळेच धरणाचे दरवाजे उद्या (रविवारी) उघडण्यात येणार असून त्यातून प्रतिसेकंद दहा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता ज्ञानेश्र्वर बागडे यांनी दिली.

चोवीस तासात कोयनानगरला १३४ (३२१८), नवजाला ९७ (३४९८) व महाबळेश्र्वरला ९७ (२९९३) मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरणाची एकुण पाणीपातळी २१४३.०१ फुट झाली आहे. कोयना धरण जलाशयात प्रतिसेकंद १२ हजार २९६ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.

Web Title: Satara news Koyna Dam water storage