कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस ओसरला

सचिन शिंदे
रविवार, 6 ऑगस्ट 2017

धरणात चोवीस तासांत ००.३० टिएमसी पाण्याची आवक झाली आहे. धरणात ८५.९६ टीएमसी पाणीसाठा आहे. चोवीस तासात पाऊस होतोय मात्र त्या हलक्या सरी आहेत. पाच दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला आहे.

कऱ्हाड : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस ओसरला असला तरिही चोवीस तासात 00.30 टीएमसीने पाणीसाठा वाढला. पाणलोट क्षेत्रात हलका पाऊस आहे. त्यामुळे कमी जास्त प्रमाणात धरणात पाण्याची आवक सुरू आहे.

धरणात चोवीस तासांत ००.३० टिएमसी पाण्याची आवक झाली आहे. धरणात ८५.९६ टीएमसी पाणीसाठा आहे. चोवीस तासात पाऊस होतोय मात्र त्या हलक्या सरी आहेत. पाच दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला आहे. धरणात पाण्याची आवक कमी झाल्याने धरणाचे वक्र दरवाजे बंद केले.

पायथा वीजगृहातुन सोडण्यात येणारे पाणीही बंद केले आहे. चोवीस तासात कोयनानगरला ४ (३३८०), नवजाला १३ (३७५०) व महाबळेश्र्वरला १६ (३२२८) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणाची पाणी पातळी २१४७.१० फुट झाली आहे. कोयना जलाशयात प्रतिसेकंद नऊ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

Web Title: Satara news Koyna dam water storage