कोयना धरणातील पाणीसाठा ९२.१७ टीएमसी

सचिन शिंदे
रविवार, 27 ऑगस्ट 2017

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. काल सकाळपासून पावसाची रिमझीम सुरू आहे. काल दिवसभर पावसाच्या सरी झाल्या. कोयना धरणाची पाणी पातळी ०.९४ फुटाने वाढली. आज धरणाचे पाण्याची पातळी २१५३.०४  फुट आहे.

कऱ्हाड : कोयना परिसरात काल रात्रीपासून चांगला पाऊस झाल्याने धरणाच्या पाणी साठ्यात ०.४३ टीएमसीने वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा ९२.१७ टीएमसी आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. काल सकाळपासून पावसाची रिमझीम सुरू आहे. काल दिवसभर पावसाच्या सरी झाल्या. कोयना धरणाची पाणी पातळी ०.९४ फुटाने वाढली. आज धरणाचे पाण्याची पातळी २१५३.०४  फुट आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात तीन दिवसात सरासरी १५० मिलीमीटर पाऊस झाला आहे.

तीन दिवसात कोयनेला १५७, नवजाला २१४ तर महाबळेश्वरला १८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर चोवीस तासात कोयनानगरला २८ (३७६९), नवजाला ५३ (४३६६ आणि महाबळेश्र्वरला ५६ (३७१०) मिलीमीटर पावसाची नोंद झाली. धरणात आठ हजार ४४१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. पायथा वीजगृहातुन कोयनानदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु ठेवलेला असुन एक हजार ४९९ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

Web Title: Satara news Koyna dam water storage