कोयना धरणातील पाणीसाठा शंभर टीएमसीकडे

सचिन शिंदे
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

आजही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळ पासून रिमझिम सुरू आहे. कोयना धरणाची पाणी पातळी ९९.९५ टीएमसी आहे. धरणाच्या पाण्याची पातळी २१५९.०५ फुट आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात तीन दिवसात सरासरी चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे कोयना पाणलोट क्षेत्रात आजअखेर पडलेल्या पावसाने चार हजार मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

कऱ्हाड : कोयना धरणातील पाणीसाठा शंभर टीएमसीपर्यंत गेला असून, सध्या कोयना धरणातील पाणीसाठा ९९.९५ टीएमसी आहे. चोवीस तासात धरणाच्या पाणी साठ्यात १.६० टीएमसीने वाढ झाली. धरणाची पाणी पातळी १.०३ फुटाने वाढली.

धरणाने शंभर टीएमसचा टप्पा गाठल्याने व्यवस्थापनाची एक सप्टेंबरची निर्धारीत जलपातळी गाठण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे यंदा दुसऱ्यांदा धरणातून पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे, असे धरण व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले. दोन परिसरात दिवसात चांगला पाऊस झाला. त्याचा जोर कमी होता. मात्र काल त्याची रिमझिम कायम होती. त्यामुळे चोवीस तासात कोयने शंभर टीएमसीचा टप्पा गाठला आहे.

आजही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळ पासून रिमझिम सुरू आहे. धरणाच्या पाण्याची पातळी २१५९.०५ फुट आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात तीन दिवसात सरासरी चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे कोयना पाणलोट क्षेत्रात आजअखेर पडलेल्या पावसाने चार हजार मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. चोवीस तासात कोयनानगरला ३७ (३९९६ ), नवजाला ५०  (४७३५ ) आणि महाबळेश्र्वरला ३६  (४००७्)  मिलीमीटर पावसाची नोंद झाली. धरणात दहा हजार ७८४ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. पायथा वीजगृहातुन कोयना नदी पात्रात पाण्याचा एक हजार २८ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

Web Title: Satara news Koyna Dam water storage