कोयना धरणातील क्षमतेमुळे वीज निर्मिती व सिंचनाचा प्रश्न सुटला

सचिन शिंदे
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

जुनच्या पहिल्या आठवड्याचा अपवाद सोडला तर मॉन्सुनच्या पावसाने २६ जुनपर्यंत दडी मारली होती. २६ जुनला दमदार पावसास सुरुवात झाली त्यावेळी कोयना धरणात १९.४३ टीएमसी पाणीसाठा होता. २६ जुन ते ७ जुलै या ११ दिवसात पडलेल्या दमदार पावसाने कोयना धरणात १७.५१ टीएमसी पाण्याची आवक झाली होती. त्यानंतर विश्रांती व पुन्हा ऑगष्टमध्ये मुसळधार पावसाने झोडपल्याने धरणाने पाणीसाठ्याचे शतक पुर्ण केले होते. तीन सप्टेंबरला १०१.७८ टीएमसी पाणीसाठा गेला होता.

पाटण (ता. पाटण, जि. सातारा) : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जुलै महिन्यात मॉन्सूनच्या व सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोयना धरण पुर्ण क्षमतेकडे वाटचाल करीत असुन वीज निर्मीती व सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.

कोयना धरणात १ जूनपासून आज पर्यंत १०६.८७ टीएमसी पाण्याची आवक झाली असुन पश्चिमेकडे वीजनिर्मीतीसाठी १५.०४ टीएमसी, पुर्वेकडे वक्रदरवाजातुन १.२८ टीएमसी आणि पायथा वीजगृहातुन सिंचनासाठी ३.३३ व पाणीसाठा नियंत्रणासाठी ०.७७ टीएमसी असा एकुण चार टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

जुनच्या पहिल्या आठवड्याचा अपवाद सोडला तर मॉन्सुनच्या पावसाने २६ जुनपर्यंत दडी मारली होती. २६ जुनला दमदार पावसास सुरुवात झाली त्यावेळी कोयना धरणात १९.४३ टीएमसी पाणीसाठा होता. २६ जुन ते ७ जुलै या ११ दिवसात पडलेल्या दमदार पावसाने कोयना धरणात १७.५१ टीएमसी पाण्याची आवक झाली होती. त्यानंतर विश्रांती व पुन्हा ऑगष्टमध्ये मुसळधार पावसाने झोडपल्याने धरणाने पाणीसाठ्याचे शतक पुर्ण केले होते. तीन सप्टेंबरला १०१.७८ टीएमसी पाणीसाठा गेला होता. मात्र पावसाने पुर्ण घेतलेली विश्रांती व कोळशाच्या तुटवड्यामुळे पश्चिमेकडील वीज निर्मीती वाढविल्याने पाणीसाठा ९८.५६ टीएमसीपर्यंत खाली आला होता.

गेली तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा पाणीसाठा वाढण्यास व धरण पुर्ण क्षमतेने भरण्यास मदत झाली आहे. गतवर्षी दिवशी कोयना धरणात १०३.८४ टीएमसी पाणीसाठा व २१६२.५ फुट पाणीपातळी होती. आज सकाळी १०४.१७ टीएमसी पाणीसाठा व पाणीपातळी २१६२.८ फुट आहे. गतवर्षी कोयनानगरला ४४३९ मिलीमीटर, नवजाला ५६२१ मिलीमीटर व महाबळेश्र्वरला ४९८८ मिलीमीटर पाऊस पडला होता. आजपर्यंत कोयनानगरला ४३८८ मिलीमीटर, नवजाला ५२६५ मिलीमीटर व महाबळेश्र्वरला ४४४९ मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली आहे.

कोयना धरणात १ जुनपासुन १०६.८७ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. त्यापैकी १५ टीएमसी पाणी पश्चिमेकडे वीजनिर्मीतीसाठी वापरण्यात आले आहे. पायथा वीजगृहातुन सिंचनासाठी ३.३३ व पाणीसाठा नियंत्रणासाठी ०.७७ असे एकुण चार टीएमसी पाणी कोयनानदीत सोडण्यात आले. सहा वक्रदरवाजातुन १.२८ टीएमसी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. त्यामुळे पुर्वेकडे सिंचन व पाणीसाठा नियंत्रणासाठी ५.२८ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. धरण पुर्णक्षमतेने भरल्याने महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला असुन सिंचन व वीजनिर्मीतीचा प्रश्न सुटला आहे.

Web Title: Satara news Koyna dam water storage