लक्षात ठेवा, बिबट्या मनुष्यभक्षी नाही!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

सातारा - जिल्ह्यातील सातारा तालुक्‍यासह फलटण, कऱ्हाड या तालुक्‍यांमध्ये बिबट्यांचा वावर वाढला आहे. मनुष्य वस्तीजवळ आलेल्या या वन्यजीवामुळे भीतीचे वातावरण आहे. परिसरातील ग्रामस्थांनी काही काळजी घेतल्यास वन्यजीवापासून बचाव करता येतो. कोणताही वन्यजीव मनुष्यभक्षी नाही, ही बाबत लक्षात ठेवून मानवी वर्तन राहिले पाहिजे.

जिल्ह्यातील पाटण, कऱ्हाड, सातारा या तालुक्‍यांत बिबट्यांचा वावर ही बाब आता सरावाची झाली आहे. मात्र, फलटणसारख्या तालुक्‍यात बिबट्या दर्शन देऊ लागला आहे.

ऊस, ज्वारीसारखी पिके बिबट्यासाठी आश्रयस्थाने ठरली आहेत. मनुष्यवस्तीजवळ रात्रीच्या वेळी गुरे-ढोरे, पाळीव-भटकी कुत्री यांच्यावर हल्ला करून पुन्हा पिकात जाऊन बसणे त्याला सोईचे झाले आहे. अशा वेळी परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांनी काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊन जागरुकता बाळगणे आवश्‍यक आहे, असे आवाहन उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी केले आहे.

...हे करा
शेतात काम करताना एकट्याने काम करू नये, जमावाने काम करावे
रात्रीच्या वेळी गोठा सर्व बाजूंनी बंदिस्त राहील, याची काळजी घ्या
बिबट्याच्या वास्तव्याची, घडणाऱ्या घटनेची माहिती तत्काळ वन विभागाला द्या
वस्तीपासून शेतापर्यंत तसेच शालेय विद्यार्थ्यांचे येणे-जाणे जमावाने असावे
मोठ्या माणसांनी हातात प्रतिबंधक उपाय म्हणून काठी बाळगावी.

...हे करू नका
संध्याकाळच्या वेळेस घराच्या अंगणात, परिसरात मुलांना एकटे खेळू देऊ नये
संध्याकाळी सहा ते नऊ या वेळात जास्त खबरदारी घ्यावी
बिबट्या हा मांजर कुळातील असल्याने तो दिसल्यावर घाबरून तसेच गडबडून गोंधळ नको
गुराख्यांनी गावापासून दूर तसेच वनाच्या खूप जवळ गुरेचराईस जाणे 
बिबट्या दिसल्यास जमावाने त्याच्या मागे, जवळ जाऊ नये. गोंगाट, दगड-काठी मारणे, डिवचणे टाळावे
अशा कृत्यामुळे तो चवताळून स्वसंरक्षणार्थ माणसावर हल्ला करण्याची शक्‍यता असते

...हे लक्षात ठेवा
बिबट्या शक्‍यतो एकट्या-दुकट्यावर, विशेषत: काम करताना खाली वाकलेल्या, बसून काम करणाऱ्यांवर पाठीमागून हल्ला करतो
बिबट्या दिसला की तो पिंजराबंद करणे प्रत्येकवेळी आवश्‍यक नसते हे लक्षता घ्या
बिबट्याचा जंगल हा नैसर्गिक अधिवास आहे. त्यामुळे तो जंगलापासून काही अंतरावर पाण्याच्या, भक्ष्याच्या शोधार्थ बाहेर येतो 
तो नरभक्षक नसल्याने माणसावर हल्ला करत नाहीत, तो पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात जातो
शूटिंग, फोटोसाठी बिबट्याच्या मागे लागू नका. आजारी, कमजोर बिबट्या घाबरून अपघाती मृत्यू होण्याची शक्‍यता असते 

Web Title: satara news leopard