कऱ्हाडसह पाटण तालुक्यात नागरी वस्तीत बिबट्याचा वावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

कऱ्हाड (सातारा): कऱ्हाडसह पाटण तालुक्यात अनेक गावात बिबट्या थेट नागरी वस्तीत शिरत आहे. किंबहुना अनेक गावातील रस्ते बिबट्याचे नेहमीचेच भ्रमण मार्ग झाल्याचे दिसत असतानाही त्याकडे फारशा गांभीर्याने पाहिले जात नाही.

कऱ्हाडसह पाटण दोन्ही तालुक्यात ऊसाचे क्षेत्र जास्त असल्याने बिबट्याची संख्या वाढली आहे. 2014 मध्ये बिबट्याची मोजणी झाली त्यावेळी ३३ बिबट्या दिसल्याची नोंद वन विभागाकडे आहे. मात्र, त्यानंतर अलीकडे त्याची मोजदादच झालेली नाही. त्यामुळे वाढलेल्या बिबट्याच्या संख्येबाबत दस्तूर खुद्द वन विभागाच अनभिज्ञ आहे. त्यामुळे वाढत्या बिबट्यांच्या प्रजनानबाबात अंदाज लावताच येत नाही, अशी स्थिती आहे.

दोन्ही तालुक्यात बिबट्या विरूद्ध मनुष्य असा संघर्ष ऐरणीवर आला आहे. त्यासाठी शासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. वाठार येथे उद्दभवलेल्या संघर्षानंतर नागरी वस्तीत शिरणाऱ्या कऱहाडसह पाटण तालुक्यातील बिबट्यांची मोजदाद करण्यासाठी शासकीय पातळीवर हालाचील होण्याची गरज आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Web Title: satara news leopard in karad and patan area