कऱ्हाड: वाठार परिसरात बिबट्याचा मुक्तपणे वावर

leopard
leopard

कऱ्हाड - तालुक्यातील वाठारच्या शेतात सलग चौथ्या दिवशी बिबट्याचे वास्तव्य कायम आहे. सोमवारी रात्री येथील एका महिलेच्या अंगावर बिबट्याने झेप घेतली. मात्र लोकांनी आरडा आेरडा केल्याने तो प्रसंग टळला. मात्र भीती मात्र कायम आहे. 

काले जुजारवाडी वाठार रस्त्याच्या कडेला असलेल्या संजय साळवे, तानाजी माने व सर्जेराव कांदेकर यांच्या वस्ती परिसरात दोन बिबट्याची पिल्ले फिरताना चार दिवसांपासून दिसत आहेत. येथील कांदेकर यांचे रेडकू व जुजारवाडी येथील अधिकराव पाटील यांचे कुत्रे बिबट्याचे फस्त केले आहे. तर दोन दिवसापासून मानेंच्या वस्ती शेजारील ऊसाच्या शेतात बिबटे वावरत आहे. काल दुपारी शेतातून जनावरासाठी वैरण आणण्यासाठी गेलेल्या अनिता साळवे यांच्या दिशेने बांधावर बसलेल्या बिबट्याने झेप घेतली. मात्र त्याच वेळी तेथे उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी आरडा आेरड केल्याने बिबट्याची झेपे पासून त्यांचा जीव वाचला. लोकांच्या आवाजाने बिबट्याने तेथून पलायन केले.

आज सकाळी माने व साळवेंच्या घरातील शेतकरी जनावरासाठी बांधावरील घास गवत कापण्यासाठी गेले होते. अर्धे काम उरकून वैरणीचे आेझे  बांधत असताना बिबट्या काढलेल्या वैरणीच्याच बिबट्या वैरणीच्या बिबट्या वैरणीच्या बांधावरच येवून बसल्याने त्या शेतकऱ्यांने आेरडतच तेथून धूम ठोकली. बांधावरील बिबट्याला पाहण्यासाठी परीसरात शेतकरी गोळा झाले. लोकांच्या आरडोआेरड्याने बिबट्याने तेथून पलायन केले. आज दुपारी बाराच्या सुमारास जनता बॅंकेचे अध्यक्ष राजेश पाटील वाठारकर यांच्या मालकीच्या शेतातील उसाची इतरत्र लागण करणेसाठी मजूर उस तोडत होते. मात्र उस तोडणी चालू असतानाच उसातून समोरूनच बिबट्या चालत आल्याने मजूरांनी धूम ठोकली.

वाठार परीसरातील शिवारात बिबट्याचा वावर अनेकांच्या जीवावर बेतू शकतो. याच परिसरात वाठार मधील हायस्कूल, कृष्णा इंग्लिश मिडीयम स्कूल व अंगणवाडीचे वर्ग आहेत. त्यामुळे दिवसाही खुलेआम बिबट्याची भटकंती अनेकांच्या मनात भीती निर्माण करत आहे. याबाबत वन विभागाला याची माहिती गावकऱ्यांनी दिली अाहे. वनविभागाचे अधिकारी यांनीही बिबट्याचे या परीसरात वास्तव्य मान्य केले असले तरी त्याला पकडण्यासाठी कोणतीही परवानगी नसल्याने त्याला पकडता येत नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. दररोज पाचट काढणे व शेतीतील इतर कामानांही मजूर बिबट्याच्या भीती ने येत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक समश्यांना तोंड द्यावे लागत आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com