महाबळेश्वरमध्ये सांगलीतील प्रेमी युगुलाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

भिलार - महाबळेश्वर शहरातील केट्स पॉईंट येथे एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी 8 वाजता ही घटना उघडकीस आली.

भिलार - महाबळेश्वर शहरातील केट्स पॉईंट येथे एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी 8 वाजता ही घटना उघडकीस आली.

हे दोघेही सांगली येथील आहेत. अविनाश आनंदा जाधव ( वय 28) व तेजश्री रमेश नलावडे अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी येथील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. अविनाश हा सांगली येथील मानसिंग सहकारी बँकेचा कर्मचारी आहे. त्यांच्याजवळून एक चिट्ठी आढळून आली आहे.त्यावरून महाबळेश्वर पोलिस अधिक तपास करत आहेत. 

Web Title: Satara News Lovers Couple from Sangli Suicide