मीडिया, तुला पोलिसांवर  ‘विश्‍वास’ नाय का..

सिद्धार्थ लाटकर
सोमवार, 24 जुलै 2017

कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी प्रसिद्धिमाध्यमांपुढे खासदार उदयनराजे भोसले यांना कोणत्याही क्षणी अटक करू, असे सांगितले होते; परंतु उदयनराजे यांचे शुक्रवारी साताऱ्यात झालेले आगमन, कार्यकर्त्यांनी त्यांच्या समवेत केलेला रोड शो आणि त्याचवेळी पोलिसांनी घेतलेली बघ्याची भूमिका यामुळे नांगरे-पाटील यांचा आत्मविश्‍वास औट घटकेचाच होता की काय, असा सवाल आता केला जाऊ लागला आहे. पुढ्यात असताना उदयनराजेंना अटक का केली गेली नाही, यावरून पोलिस टिकेचे धनी झाले आहेत. सोशल मीडियावरही त्याबाबत पोलिसांचे विडंबन केले जात आहे.

कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वी प्रसिद्धिमाध्यमांपुढे खासदार उदयनराजे भोसले यांना कोणत्याही क्षणी अटक करू, असे सांगितले होते; परंतु उदयनराजे यांचे शुक्रवारी साताऱ्यात झालेले आगमन, कार्यकर्त्यांनी त्यांच्या समवेत केलेला रोड शो आणि त्याचवेळी पोलिसांनी घेतलेली बघ्याची भूमिका यामुळे नांगरे-पाटील यांचा आत्मविश्‍वास औट घटकेचाच होता की काय, असा सवाल आता केला जाऊ लागला आहे. पुढ्यात असताना उदयनराजेंना अटक का केली गेली नाही, यावरून पोलिस टिकेचे धनी झाले आहेत. सोशल मीडियावरही त्याबाबत पोलिसांचे विडंबन केले जात आहे. येथे उदयनराजे निमित्त ठरले असले, तरी सोशल मीडियाच्या मनात नेमका प्रश्‍न आहे, तो अन्य गुन्हेगारांबाबत काय? 

चोऱ्या, दरोडे, सावकरीत अडकला सातारकर...सातारकर... 
खंड्या धाराशिवकर फिरतोय गावभर...गावभर... 
सावकारीची पाळेमुळे कशी खोल खोल...खोल खोल... 
का नाही मिळत धाराशिवकर आता बोल बोल...बोल बोल... 
मीडिया तू माझ्या संगे गोड बोल...गोड बोल 
मिडिया तुला पोलिसांवर "विश्‍वास' नाय का...नाय का... 

सातारच्या पोलिसांची कामगिरी कशी छान छान...छान छान 
निलंबनाच्या सत्राने प्रतिमा झाली घाण घाण... घाण घाण 
मोकाट आरोपींची वाढतेय शान शान...शान शान... 
मीडिया तू माझ्या संगे गोड बोल...गोड बोल 
मीडिया तुला पोलिसांवर "विश्‍वास' नाय का...नाय का... 

उदयनराजेंचा झाला रोड शो...रोड शो... 
कार्यकर्त्यांनी रस्ते कसे ओव्हर फ्लो...ओव्हर फ्लो... 
पोलिस ऍथॉरिटीची झाली पोल खोल... पोल खोल... 
मीडिया तू माझ्या संगे गोड बोल...गोड बोल... 
मीडिया तुला पोलिसांवर "विश्‍वास' नाय का...नाय का... 

सावकारीने सामान्य झाला बेहाल...बेहाल... 
सारेच पोलिस कसे खुशहाल...खुशहाल... 
कायदा व सुव्यवस्थेचीच झाली इथे ढाल...ढाल... 
मीडिया तू माझ्या संगे गोड बोल...गोड बोल... 
मीडिया तुला पोलिसांवर "विश्‍वास' नाय का...नाय का...

Web Title: satara news media police