‘मिथेन’मुळे धूमसतोय कचरा डेपो

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

सातारा - पालिकेच्या डेपोतील कचऱ्याचा प्रश्‍न गेल्या काही महिन्यांपासून धुपत आहे. या कचरा डेपोतील धुरामुळे सोनगाव व जकातवाडी ग्रामस्थ त्रस्त आहेत. कचरा जाळणे गुन्हा असताना कोण लावते या कचऱ्याला आग असा प्रश्‍न आहे. कचऱ्यातून बाहेर पडणारा ‘मिथेन’ नावाचा वायू कचऱ्याचा प्रश्‍न धुपत ठेवण्यास कारणीभूत असल्याची माहिती पुढे आली आहे.

पालिका मालकीच्या सोनगाव येथील कचरा डेपोत गेल्या ४० वर्षांत कचऱ्याचे ढिग तयार झाले. या कचऱ्याची विल्हेवाट करणारे अनेक प्रस्ताव तयार झाले.

मात्र, कोणता प्रकल्प पालिकेला आजअखेर राबविता आला नाही. त्यामुळे अधून- मधून कचरा पेटत राहिला; कचऱ्याचा प्रश्‍न धूमसत राहिला. या कचऱ्याचा सर्वाधिक त्रास सहन करणाऱ्या सोनगाव ग्रामस्थांनी अनेक निवेदने दिली, आंदोलने केली. मात्र, डेपोतील कचरा पेटवतं कोण? या प्रश्‍नाचे उत्तर काही मिळाले नाही. कचरा धुपतच राहिला, कचरा डेपोचा प्रश्‍न धूमसतच राहिला. पालिकेच्या डेपोतील हा कचरा कोणी पेटवत नसून ती एक रासायनिक क्रिया घडते. त्यामुळे हा कचरा धुपत राहतो, संध्याकाळच्या वेळी हवेने निर्माण झालेली ठिणगी पसरून आग पसरते, अशी माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी दिली. 

कचऱ्यात सेंद्रिय पदार्थ असतो त्याचे विघटन होते. त्यातून तयार झालेला मिथेन गॅस कचऱ्याच्या ढिगाखालून बाहेर पडायला बघतो. हवेत आर्द्रता कमी झाली आणि त्यात वाढते उन्ह यामुळे हा कचरा ढिगाऱ्याखाली धुपत राहतो आणि वाऱ्याने तो पसरतो, एक प्रकारची ही रासायनिक प्रक्रिया आहे, असे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

ओला कचरा कुजून तयार होतो ‘मिथेन’ वायू
घनकचरा विलगीकरण व प्रक्रिया क्षेत्रात गेली काही वर्षे काम करणारे आस्था सामाजिक संस्थेचे विजयकुमार निंबाळकर यांनी सांगितले, ‘‘पूर्वी कधी कचऱ्याला आग लागलेली असते. कचऱ्याचा ढिगारा २०-२५ फूट खोल असतो. कचऱ्यावर माती टाकून, टॅंकरने पाणी मारून ती विझविली जाते. ही आग पुरेशी विझली नसेल तर काही फूट खोल ढिगाऱ्याखाली ती धूमसत राहते. ढिगाऱ्याच्या खालच्या स्तरावर गाडला गेलेला ओला कचरा कुजून तयार झालेला मिथेन हा वायू सुका कचरा पेटविण्यास साह्यभूत ठरतो.’’

Web Title: satara news methane garbage depo