दूध उत्पादकांचा खासगीकडे कल!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

सातारा - दुधाचे उत्पादन वाढत असताना जिल्ह्यात ४०० सहकारी दूध संस्थांत दररोज केवळ तीन लाख लिटर दूध संकलन होत आहे. तर, खासगी दूध संस्थांचे संकलन १८ लाख लिटरवर गेले आहे. जिल्ह्याबाहेरून तब्बल नऊ लाख लिटर दूध सातारा जिल्ह्यात येते. सहकारी दूध संस्थांचे मोडलेले  कंबरडे सुरळीत होण्यासाठी चांगला दूध दर आणि दूध संस्थांना ऊर्जितावस्था देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. 

जिल्ह्यात ३५६ प्राथमिक सहकारी दूध संस्था, तर आठ मध्यवर्ती दूध संस्था आहेत. जिल्ह्याचे दूध संकलन २१ लाख ५१९ लिटर आहे. त्यापैकी सहकारी दूध संस्थांकडे केवळ ३.२३ लाख लिटर संकलन होते. तर खासगी दूध संस्थांकडे तब्बल १८.२८ लाख लिटर दुधाचे संकलन होते. जिल्ह्याबाहेरून ९.३९ लाख लिटर दूध जिल्ह्यात येते. जिल्ह्यात दुधाचे उत्पादन दिवसेंदिवस वाढत असले तरी ते सहकारी संस्थांऐवजी खासगी दूध संस्थांना फायदेशीर ठरणारे आहे. दूध संकलनात फलटण तालुका आघाडीवर असून या तालुक्‍यात १४.६० लाख लिटर दुधाचे संकलन होते. त्यामध्ये सहकारी संस्थांकडील १.५७ लाख लिटर, तर खासगी दूध संस्थांकडे १३ लाख लिटर दुधाचा समावेश आहे. सध्या गाईच्या दुधाला २३ ते २८ रुपये, तर म्हशीच्या दुधाला ३३ रुपये लिटरमागे दर मिळतो. जिल्ह्यात दराच्या विषमतेमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय दूध संकलन (लाख लिटर)  
फलटण- १४.६०, माण- १.०६, खटाव- ०.९६, कऱ्हाड- १.४७, पाटण- ०.८६, सातारा- ०.९६, महाबळेश्‍वर- ०.०२८, जावळी- ०.१७, खंडाळा- ०.४४, वाई- ०.३४, कोरेगाव- ०.६२.

सहकारीऐवजी स्वतःच्या संस्थेला प्राधान्य
सहकारी दूध संस्थांतील राजकीय हस्तक्षेपामुळे या संस्था अडचणीत आल्या किंवा बंद पडल्यामुळे सहकारातील दुधावरची साय गायब झाली आहे. राजकीय नेत्यांनी स्वत: सहकारी दूध संस्था बंद करून तेथे आपली खासगी दूध संस्था निर्माण केली. परिणामी हे खासगी दूध संस्थांचे संकलन वाढले आहे.

Web Title: satara news Milk producer

टॅग्स