रणजित खवळेवर खासगी सावकारीचा गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

सातारा : व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी घरात घुसून साहित्याची मोडतोड करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकावर खासगी सावकारी प्रतिबंधक कायद्यानुसार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी घरात घुसून साहित्याची मोडतोड करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकावर खासगी सावकारी प्रतिबंधक कायद्यानुसार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रणजित खवळे (रा. कोडोली) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत कृष्णात आत्माराम जाधव (रा. कोडोली) यांनी फिर्याद दिली आहे. जाधव हमाली काम करतात. जानेवारी 2016 मध्ये त्यांनी खवळेकडून महिना 20 टक्के व्याजदराने 20 हजार रुपये घेतले होते. त्या पोटी त्यांनी 70 हजार 500 रुपये खवळेला परतही केले. तरीही मुद्दल बाकी असल्याचे सांगत तो जाधव यांना धमकावत होता. मंगळवारी (ता.20) रात्री आठच्या सुमारास तो जाधव यांच्या घरी आला. घरातील होमथिएटरची त्याने मोडतोड केली. तसेच मुद्दल न दिल्यास घरातील वस्तू नेईन, असे म्हणत साहित्य उचलण्यास सुरवात केली. त्याला विरोध केल्यामुळे चिडून त्याने मला व पत्नीला मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे जाधव त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हवालदार जाधव तपास करत आहेत.

Web Title: satara news moneylender register case