कृषिपंप वीजबिलातून थकबाकीमुक्तीची संधी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

सातारा - जिल्ह्यातील ८८ हजारांहून अधिक कृषिपंपधारक शेतकऱ्यांना मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेद्वारे वीज बिलाच्या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी मिळाली आहे.

सातारा - जिल्ह्यातील ८८ हजारांहून अधिक कृषिपंपधारक शेतकऱ्यांना मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेद्वारे वीज बिलाच्या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी मिळाली आहे.

महावितरणच्या प्रवक्‍त्याने याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘‘शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत ३१ मार्चपर्यंत असलेल्या मूळ थकबाकीचा हप्त्यांनी भरणा केल्यास व्याज व दंड माफ केले जाणार आहे. जिल्ह्यातील ८८ हजार ८५१ ग्राहकांकडे १८९ कोटी ९८ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यातील १५२ कोटी ३९ लाख रुपयांची मूळ थकबाकी दिलेल्या हप्त्यांत चालू वीज बिलांसह भरल्यास ३५ कोटी ६९ लाखांचे व्याज व एक कोटी ९० लाख रुपयांचा दंड माफ करण्याचा शासनाचा विचार आहे. ज्या कृषिपंपधारकांकडे ३० हजार रुपयांच्या आत थकबाकी आहे, अशा ग्राहकांना पाच सुलभ हप्ते तर ज्या कृषिपंपधारकांकडे ३० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी आहे, अशा ग्राहकांना मूळ थकबाकी भरण्यासाठी दहा सुलभ हप्ते मिळणार आहेत.’’

वीज बिल न मिळाल्यास थकबाकीदार कृषिपंपधारकांनी महावितरणच्या संबंधित कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: satara news MSEB agricultural electricity bill