खंडाळ्यात भर बाजारपेठेत चुलत भावावर वार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

खंडाळा - येथील मुख्य बाजारतळावर आज आठवडा बाजारादिवशी संजय मानसिंग साळुंखे (वय 54 रा. खंडाळा) याने भावकीच्या जमिनीच्या वादातून चुलतभाऊ नितीन जयसिंग साळुंखे (वय 40) यांच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

खंडाळा पोलिसांनी सांगितले, की आज सकाळी नऊच्या सुमारास जमिनीच्या व घराच्या भांडणाचा राग मनात धरून संशयित संजय साळुंखे याने ऊसतोडीसाठी वापरत असलेल्या कोयत्याने आपला चुलतभाऊ नितीन साळुंखे यांच्या हातावर व मानेजवळ वार केले. नागरिकांनी जखमीस तत्काळ खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, पुढील उपचारासाठी लोणंदला आणि तेथून पुण्याला हलविण्यात आले. या घटनेनंतर संशयित संजय साळुंखे हा स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला. संजय साळुंखे हा नौदलातून सेवानिवृत्त झाला आहे. या घटनेची फिर्याद जखमी नितीन साळुंखे यांची भावजय राधिका जनार्दन साळुंखे यांनी दिली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रकाश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन नलवडे करीत आहेत. 

Web Title: satara news murder crime