तृतीयपंथीय तरुणाचा गळा चिरून खून 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

मायणी - येथील इंदिरानगरात राहणाऱ्या दादा ऊर्फ हरीष बबन साठे (वय 35) या तृतीयपंथीय तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला. याप्रकरणी संशयित बापू महादेव पाटोळे (वय 29) व गणेश अप्पासाहेब पाटोळे (वय 40) (दोघेही रा. मायणी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ः फुलेनगर रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या काही लोकांना रस्त्यालगत चांद नदी पात्रात अंगावर साडी परिधान केलेले कोणी तरी गवतात बराच काळ निपचित पडलेले निदर्शनास आले. संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पाहणी केली असता एका व्यक्तीचा गळा चिरून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. बघ्यांनी मृतदेह ओळखला. तो मृतदेह हरीष साठे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. त्या वेळी मातंग समाजातील कार्यकर्ते संतापले. त्यांनी घटनेबाबत निषेध मोर्चा काढला. सर्व जण जमावाने पोलिस ठाण्यात गेले. खुनाचा तातडीने तपास करून संबंधितांना कठोर शासन करण्याची त्यांनी आग्रही मागणी केली. त्या वेळी काही काळ तणावही निर्माण झाला. मात्र, पोलिसांनी तत्काळ तपास करण्याचे आश्वासन देऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवली. खबऱ्यांकडून माहिती घेत त्यांनी संशयितांना ताब्यात घेतले. त्यापैकी बापू पाटोळे याला कार्वे (ता. खानापूर, जि. सांगली) येथून ताब्यात घेतला, तर गणेश पाटोळेला त्याच्या स्वतःच्या शेतातून ताब्यात घेतले गेले. या कारवाईत पोलिस हवालदार राघू खाडे, अरुण बुधावले, संदीप हनुवटे यांच्यासह सहायक पोलिस उपनिरीक्षक संतोष गोसावी यांनी सक्रिय भाग घेतला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच दहिवडीचे पोलिस उपअधीक्षक यशवंत काळे, वडूजचे पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के यांनी घटनास्थळी भेट दिली. 

Web Title: satara news murder crime

टॅग्स