विषारी औषध पाजून चिमुकल्याचा खून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

दहिवडी - मुलगा दत्तक देण्यास पत्नीने विरोध केल्याने वडिलानेच स्वतःच्या सव्वादोन महिन्यांच्या चिमुकल्याला विषारी औषध पाजून मारले. फुलेनगर-बिदाल (ता. माण) येथे ही घटना घडली असून, मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार पती रणजित सुरेश बुलुंगे (वय 27) यास अटक करण्यात आली आहे. 

दहिवडी - मुलगा दत्तक देण्यास पत्नीने विरोध केल्याने वडिलानेच स्वतःच्या सव्वादोन महिन्यांच्या चिमुकल्याला विषारी औषध पाजून मारले. फुलेनगर-बिदाल (ता. माण) येथे ही घटना घडली असून, मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार पती रणजित सुरेश बुलुंगे (वय 27) यास अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी रणजित बुलुंगे (मूळ रा. सुरूर, ता. वाई) या दुसऱ्या मुलाच्या बाळंतपणासाठी माहेरी फुलेनगर-बिदाल (ता. माण) येथे आल्या होत्या. शनिवारी (ता. 20) त्यांचे पती रणजित सुरेश बुलुंगे हा सासरवाडीला आला होता. मुलगा दत्तक देऊ असे तो पत्नीला सांगत होता. मात्र, पत्नी व सासू-सासऱ्यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर सासू-सासऱ्यांनी 

जेवणासाठी आग्रह केला आसता रणजित जेवण न करता बेडरूममध्ये जाऊन बसला. त्याच वेळी रात्री साडेनऊच्या सुमारास इतर लोक किचनमध्ये जेवण करत असतानाच लाईट गेली. त्याच वेळी मुलाच्या रडण्याचा आवाज आल्याने माधुरी यांनी दिवा लावला. तोपर्यत रणजितने मुलगा वेदांतला (वय- दोन महिने 19 दिवस) उचलून घेतले होते. त्यानंतर त्याला उलटी झाली. शेतात घर असल्याने रणजितकडे मुलाला दवाखान्यात नेण्याचा आग्रह केला; परंतु त्याने नकार दिला. मुलाच्या तोंडाचा विषारी औषधासारखा वास येत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी रणजित निघून गेला. माधुरी यांनी वेदांतला दहिवडीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, डॉक्‍टरांनी त्यांना सातारा येथे दाखल करण्यास सांगितले. उपचार सुरू असतानाच काल (ता. 21) वेदांतचा मृत्यू झाला. दरम्यान, माधुरी यांनी घराची झडती घेतली असता मुलाच्या औषधात विषारी औषधाचा वास आल्याने पती रणजित यानेच कृत्य केल्याची फिर्याद त्यांनी दिली. त्यानुसार रणजित याच्यावर मुलाचा खून केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील तपास करीत आहेत.

Web Title: satara news murder crime