प्रेमसंबंधांच्या कारणावरून अभेपुरीत मित्राचा खून 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

वाई - बहिणीबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एकाने आपल्या मित्राचा खून करून मृतदेह धोम उजव्या कालव्यात टाकला. अभेपुरी (ता. वाई) येथील अरुण नामदेव मोहिते (वय 21) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अभेपुरीतील युवकाला अटक केली असून, त्याला आज न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

पोलिसांनी सांगितले, की अक्षय नामदेव मोहिते याने मंगळवारी आपला भाऊ अरुण बेपत्ता झाल्याची फिर्याद वाई पोलिस ठाण्यात दिली होती. तो अभेपुरी येथून त्याच्या मित्राबरोबर वाईला काम पाहण्यासाठी म्हणून निघून आल्याचेही फिर्यादीत म्हटले होते. याबाबत पोलिसांनी संबंधित युवकाकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे लक्षात आले. दरम्यान, बुधवारी मालकमपेठ - पसरणी हद्दीत धोम उजव्या कालव्यात एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळला. तो अरुणचा असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाच्या डोक्‍यावर मोठी जखम झाली होती, तर हाता-पायावर ओरखडल्यासारख्या खुना होत्या. त्यावरून अक्षयने आपल्या भावाचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी संशयित मित्राला रात्री उशिरा अटक केली. 

त्याची चौकशी केली असता त्याने अरुणचे आपल्या छोट्या बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून खून केल्याची कबुली दिली. अधिक तपास पोलिस उपअधीक्षक अजित टिके व पोलिस निरीक्षक विनायक वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक बबन एडगे करीत आहेत.

Web Title: satara news murder crime friend murder

टॅग्स