निवडणुकीच्या वादातून कुसूरमध्ये युवकाचा खून 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

विंग - ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून कुसूर (ता. कऱ्हाड) येथे उमेश उद्धव मोरे (वय 20) या युवकाचा खून झाला. काल (मंगळवारी) सायंकाळी त्याच्यावर गावातील बस स्थानकावर चाकू हल्ला झाला होता. रात्री दहाच्या सुमारास त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी अल्पवयीन मुलासह दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे. त्यातील गणेश आनंदराव देशमुख (वय 21, रा. कसूर) याला अटक करण्यात आली आहे. त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. 

पोलिसांनी सांगितले, की मोरे व देशमुख यांच्यात निवडणुकीच्या कारणावरून वाद झाला होता. त्यातूनच हा प्रकार घडला. त्यामुळे कसूरची आजची यात्रा रद्द करण्यात आली. गावात घटनेमुळे तणावपूर्ण शांतता होती. बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. उत्तरीय तपासणीनंतर उमेशचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

शांत, संयमी स्वभावामुळे त्याच्या मित्रपरिवार मोठा होता. उमेशच्या मागे आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. मलकापूर येथील भारती विद्यापीठात बीसीएच्या शेवटच्या वर्षात उमेश शिकत होता. दहावीत त्याने विभागात पहिला क्रमांक पटकवला होता.

Web Title: satara news murder in Kusur from the election dispute