कऱ्हाडमध्ये नारायण राणे कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

कऱ्हाड (सातारा): महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे शनिवारी कऱ्हाडला येत आहेत. ते पश्‍चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी शनिवारी (ता. 9) दुपारी कऱ्हाडला येवून तेथे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या कऱ्हाडात होणाऱ्या संवादाकडे सर्वांचे लक्ष आहे.

जिल्ह्यातून राणेंच्या स्वाभिमान पक्षात जाण्यासाठी कोण कोण इच्छुक आहेत, हे या बैठकीनंतर स्पष्ट होईल. श्री. राणे येथे पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर काय टिका करणार याकडे लक्ष लागून आहे. राणेंनी काँग्रेसचा राजीनामा दिला, त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र, राणेंना भाजपने उमेदवारी दिल्यास सेना, राष्ट्रवादीला बरोबर घेण्याच्या प्रक्रियेत ते होते. त्यामुळे राणे कऱ्हाडमध्ये येवून त्यांचा पृथ्वीराज चव्हाणांबद्दल राग नव्याने व्यक्‍त करु शकतात.

Web Title: satara news narayan rane will interact with the activist in Karhad