रखडलेले सहापदरीकरण तातडीने पूर्ण करा: श्‍वेता सिंघल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

सातारा : राष्ट्रीय महामार्ग चारचे सहापदरीकरणाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे. ज्या ठिकाणी अडचणी येत आहेत, त्या स्थळांची पाहणी करून तसा अहवाल सादर करावा. स्थानिकांची गैरसोय व नुकसान टाळून कायदेशीर मार्गाने काम करावे, तसेच संबंधित खातेदारांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज (बुधवार) केल्या.

सहापदरीकरणाच्या कामात येणाऱ्या अडचणींबाबत आज जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी महामार्गाचे प्रकल्प संचालक, काम करणारी यंत्रणा व स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.

रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे. 98 टक्के जमिनी संपादित होऊनही महामार्गाचे काम मंदगतीने होत आहे. संपादन मंडळ म्हणून आजअखेर काय कार्यवाही केली याबाबतचा शासनास, तसेच कार्यालयास अहवाल सादर करावा. महामार्गाच्या कामामुळे खिंडवाडी येथील सेवा रस्ता व रखडलेले कामकाज, भुईंज येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता, पावसाचे पाणी स्मशानभूमी व गावात येत असल्याने होणारे नुकसान, शिरवळ येथील रखडलेले सेवा रस्त्याचे काम, विद्युतवाहिनी स्थलांतरण, वेळे येथील नवीन व्हीयूपी, तसेच खेड (ता. सातारा) येथील व्हीयूपीची उंची वाढविणे यात अभिप्रेत आहे, तसेच सुरूर, वेळे येथील जमीन संपादित न करता व संबंधित खातेदारांना नुकसान भरपाई अदा केलेली नाही, याबाबत संबंधित गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सभापती, सदस्य व स्थानिक रहिवाशी, बाधित खातेदार यांचे म्हणणे विचारात घेऊन काम करावे, अशी सूचना त्यांनी केली. संबंधित खातेदारांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशीही सूचना त्यांनी केली.

सातारा- पंढरपूर या मार्गाच्या विस्तारीकरणात 97 किलोमीटरच्या अंतराचा रस्ता सातारा जिल्ह्यातून जात आहे. त्यातील सुमारे 70 किलोमीटरच्या कामाचे नियोजन झाले आहे. पुढील रस्त्यांच्या मोजणीचे काम सुरू करावे, असे आदेश त्यांनी दिले.

'सकाळ'चा पाठपुरावा
पुणे- बंगळूर महामार्गाच्या सहापदरीकरणाचे सातारा ते पुणेदरम्यानचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे, याबाबत "सकाळ'ने वेळोवेळी लक्ष वेधले आहे. 15 डिसेंबर रोजी याबाबत वृत्तमालिकाही प्रसिद्ध करून महामार्गाच्या कामाचा लेखाजोखा मांडला होता. विशेषतः रखडलेल्या कामांमुळे होणारी गैरसोय आणि काही ठिकाणी झालेले निकृष्ट काम यावर या मालिकेतून प्रकाशझोत टाकला होता.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या :
भाजपा म्हणते, राहुल गांधींचे जॅकेट 70 हजारांचे
आई-बाबा सांगा ना, आमची काय चूक...​
मृत तरुणी परत आल्याच्या अफवेने गोंधळ​
"हे राम' म्हटल्याबद्दलच्या विधानाचा विपर्यास​
सरकारी कर्मचाऱ्यांना रविवारी रजा नको; न्यायालयाची सूचना​
विकासवृद्धीसाठी झेपावे निर्यातीकडे!​

श्रीमंत देशांत भारत सहावा; अमेरिका प्रथम
तनिष्कने केली 1045 धावांची नाबाद विश्‍वविक्रमी खेळी​
दोषींवर कडक कारवाई करू; आदित्यनाथ यांनी मौन सोडले​

Web Title: satara news nation highway work collector shweta singhal