पश्चिम महाराष्ट्रात चोऱ्यांच्या नव्या ट्रेंडमुळे पोलिस खात्याची उडाली झोप

सचिन शिंदे
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. वडगाव हवेलीच्या दरोड्यात हवेत गोळीबार करून पेट्रोल पंपावर लुटणाऱ्या सहाजणांची टोळी पोलिसांनी गजाआ़ड केली. त्यात परप्रांतीय व स्थानिक संशयीतांचा समावेश आहे. ती बाब तपासात उघड झाल्यामुळे पोलिस दलही हादरले आहे. अशा गुन्ह्यांची माहिती घेवून त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी समन्वय साधूनच काम करावे लागणार आहे.

कऱ्हाड : स्थानिक युवकांना भुरळ पाडायची अन् त्यांना सोबत घेवून गुन्हे करण्याची मोडस परराज्यातील संशयित करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात गुन्हेगारीचा नव्याने रूजणाऱ्या चोऱ्यांच्या नव्या ट्रेंडमुळे पोलिस खात्याची झोप उडवली आहे.

पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. वडगाव हवेलीच्या दरोड्यात हवेत गोळीबार करून पेट्रोल पंपावर लुटणाऱ्या सहाजणांची टोळी पोलिसांनी गजाआ़ड केली. त्यात परप्रांतीय व स्थानिक संशयीतांचा समावेश आहे. ती बाब तपासात उघड झाल्यामुळे पोलिस दलही हादरले आहे. अशा गुन्ह्यांची माहिती घेवून त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी समन्वय साधूनच काम करावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात अशा संशयीतांची हिस्ट्रीसीट तयार करण्याचे आदेश दिले आहे, अशी माहिती विषेश पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.

मात्र कोणत्याही गुन्ह्याची पार्श्वभुमी नसलेल्या युवकांना भुरळ पाडून सोबत घेत परराज्य संशयीतांना केलेल्या नव्या ट्रेंडच्या तपासाचे आव्हान पोलिसांना पेलावे लागणार आहे. स्थानिक युवकांना भुरळ पाडून परप्रांतीय संशयीत गुन्हे करू लागले आहेत. पुणे मुंबईत असा ट्रेंड होता, मात्र आता पश्चीम महाराष्ट्रात मुळ धरू लागला आहे. कोल्हापूर व सांगलीला झालेल्या चोरीच्या काही गुन्ह्यात असे प्रकार उघडकीस आले आहे. वडगावच्या दरोड्याच्या गुन्ह्यात कालही तो प्रकार समोर आला. पोलिसांनी परवा रात्री शिताफीने त्या टोळीला गजाआड केले. त्यात अटकपैकी चौघेजण हरीयाणाचे आहेत. तर अन्य लोक स्थानिक आहेत. इश्वर राजकुमार सैनी (वय 21), महेंद्र सुर्यग्यान गुजर (20), दीपक राजकुमार गर्ग (25), अनमोल जीवनसिंग शर्मा (22, चौघे रा. हरियाणा) अशी परप्रांतीयांची नावे आहेत. अक्षय भरत कावरे (21, रा. अपशिंगे, ता. कडेगाव) व अन्य एक अल्पवयीन आहे. त्यात कावरे पक्षीय संघटनेचा पदाधिकारी आहे. तपासात त्या बाबी पुढे आल्या आहेत. २००६ साली सांगली येथे दरोडा टाकून दांपत्याचा खून करून पळून आलेल्या चौघांना शहर पोलसांनी येथे अटक केली होती. त्यात तीन लाखांचा मुद्देमाल जप्त झाला होता. त्यात मध्यप्रदेशातील दोघे व नगरच्या दोघांना अटक झाली होती. त्या गुन्ह्याची काल आठवण झाली.

त्या गुन्ह्यापेक्षाही कालच्या दरोड्याचे गांभीर्य वेगळेच होते. ते त्यातील गुन्हा करण्याच्या पद्धतीच्या वेगळ्याच ट्रेंडमुळेच. दरोड्यावेळी सहाही संशयीतांनी वापरलेल्या बुलेट, येथील लॉजवरचा त्यांचा रहीवास व त्यांची झालेली टोळी सगळ्याच गोष्टी पोलिस खात्याची झोप उडवणारी आहे. हरियाणातील तिघे व कडेगाव भागातील तिघे यांच्या संयुक्त टोळक्याने केलेले कृत्य अनेक गोष्टीवर प्रकाश टाकणारे आहे. त्यांच्याकडून तीस हजारांची रोकड, पाच मोबाईल, पिस्तल, दोन तलवारी, चाकू, दोन बुलेट प्रत्यक्षात पकडले. येथील लॉजवर एक डिलक्स दुचाकी व दुसऱ्या लुटीतील रक्कमही जप्त केली. चार दिवसापूर्वी याच पद्धतीने कडेगावचा पेट्रोलपंप लुटला. त्याची कबुली त्यांनी दिली आहे. त्याशिवाय कोल्हापूर भागातही काही चोऱ्यांची कबुली ते देत आहेत. चोरी करण्यापूर्वी भागाची रेकी करण्याची पद्धत पोलिसांची झोप उडवणारी आहे. येथेही त्यांनी तेच केले. कडेगाव भागातील काही लोक दिल्ली व हरियाणा येथे व्यवसायानिमित्त आहेत. त्यामुळे त्या भागातील युवकांचा तिकड्या लोकांशी संपर्क येतो. तसाच कावरे याचा इश्वर सैनी यांच्याशी संपर्क आला. सैनीला गुन्हेगारी पार्श्वभुमी होती. त्याकडे येथील युवक आकर्षीत झाले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या डोक्यात कल्पना आकार घेवू लागल्या. त्यातूनच चोऱ्या झाल्या. मात्र वडगावच्या दरोड्यावेळचा त्यांचा प्लॅन फसला अन् ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांच्या अटकेनंतर त्यांनी केलेली कबुली महत्वाची आहे. ती चोऱीच्या पद्धतीवर प्रकाश टाकणारी आहे. परराज्यात गुन्हे करून फरार व्हायचे, इकडे गुन्हे करून तिकडे जायचे, असाच शिरस्ता काही संशयीत करत आहेत. त्यासाठी ते येथील काही युवकांना त्याची भूरळ पाडत आहेत.

पोलिसांच्या त्यातील काही माहिती आली आहे. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनीही त्याचे गांभीर्य ओळखून असा चोऱ्यांची पाळमुळे खणून काढण्याची ग्वाही काल पत्रकार परिषदेत दिली. मात्र पूर्वी रेकॉर्ड नसलेल्या युवकांशी संबध वाढवून परप्रांतीय संशयीत येथे पाय रोवत आहेत. त्याचा शोध घेण्याचे आव्हान आहे. त्यासाठी सातारा, सांगली व कोल्हापूर पोलिसांना संयुक्त काम करावे लागेल, अशी स्थीती आहे. कोट परराज्यातील संशयीतांनी येवून नवख्यांना सोबत केलेल्या गुन्ह्याचा नवा प्रकार आहे. मात्र परराज्यातील संशयीतांचीही माहिती घेण्याचे काम राज्यातील पोलिस दल करत आहेत. पोलिस दलाकडेही आता अद्ययावत यंत्रणा आली आहे. त्यामुळे अशा नव्या पद्धतची माहिती संकलीत करण्याचे काम त्वरीत केले जात आहे. त्याशिवाय परराज्यातील संशयीतांची हिस्ट्री रेकॉर्ड प्रत्येक पोलिस ठाण्यात ठेवण्याचे कामही आम्ही सुरू केले आहे. त्यावर नक्कीच नियंत्रण येईल, असे विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.

Web Title: satara news new thief style in western maharashtra