नऊ बालगृहांची मान्यता रद्द

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

जिल्ह्यातील बालगृहांत २१६ विद्यार्थी; २० बालगृहे अ, ब श्रेणीत
सातारा - राज्य शासनाचे अनुदान लाटून बालगृहांत केवळ बालकांची हेळसांड होत असल्याचे लक्षात आल्यानंतर महिला व बालकल्याण विभागाने राज्यातील सर्वच बालगृहांची तपासणी केली. त्यामध्ये विविध त्रुटी आढळून आल्याने जिल्ह्यातील नऊ बालगृहांची दुकानदारी शासनाने बंद केली आहे. त्यांची मान्यता रद्द केली आहे. 

जिल्ह्यातील बालगृहांत २१६ विद्यार्थी; २० बालगृहे अ, ब श्रेणीत
सातारा - राज्य शासनाचे अनुदान लाटून बालगृहांत केवळ बालकांची हेळसांड होत असल्याचे लक्षात आल्यानंतर महिला व बालकल्याण विभागाने राज्यातील सर्वच बालगृहांची तपासणी केली. त्यामध्ये विविध त्रुटी आढळून आल्याने जिल्ह्यातील नऊ बालगृहांची दुकानदारी शासनाने बंद केली आहे. त्यांची मान्यता रद्द केली आहे. 

बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमाच्या तरतुदीनुसार काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या पुनर्वसन व इतर अत्यावश्‍यक सेवा- सुविधा पुरविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना बालगृह चालविण्यास शासनाने मान्यता दिली होती. 

राज्यात महिला बाल विकास विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांच्या एकूण ९६३ बालगृहांची त्रयस्थ यंत्रणेमार्फत २०१५ मध्ये तपासणी केली होती. त्यामध्ये जिल्ह्यातील २९ बालगृहांचा समावेश होता. या तपासणीत ‘अ’ वर्गात १२ बालगृह, ‘ब’ वर्गात आठ, तर ‘क’ व ‘ड’ वर्गात नऊ बालगृह असल्याचे निष्पन्न झाले होते. 

या तपासणीत अनेक ठिकाणी शासनाचे अनुदान लाटून केवळ दुकानदारी सुरू असल्याचे लक्षात आले होते. यातील बालकांना व्यवस्थित आहार न देणे, गणवेशाचा व्यवस्थित पुरवठा न करणे, शैक्षणिक सुविधांचा अभाव अशा अनेक मूलभूत सुविधादेखील या बालगृहात उपलब्ध नसल्याचे दिसून आले होते. या तपासणीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट पिटिशन दाखल झाले होते; पण न्यायालयाच्या निर्णयानंतर शासनाने राज्यातील ‘क’ व ‘ड’ वर्गवारीतील २१४ बालगृहांना कारणे दाखवा नोटिसा न देता त्यांची मान्यता रद्द केली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील नऊ बालगृहांचा समावेश आहे. या बालगृहांत मुलांना प्रवेश देऊ नयेत, असे आदेशही शासनाने दिले आहेत.

मान्यता रद्द केलेली बालगृहे
बालमहिला परिवर्तन मंडळाचे कनिष्ठ बालगृह उंब्रज, रयत शिक्षण संस्थेचे वरिष्ठ बालगृह देवापूर, ता. माण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ बालगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन शिक्षण प्रसारक मंडळाचे माता वंचळाई कनिष्ठ बालगृह खामगाव यांना ‘क’ वर्ग, तसेच काळेश्‍वरी शिक्षण संस्था ठोसेघर संचलित वरिष्ठ बालगृह ठोसेघर, बालमहिला परिवर्तन मंडळाचे कनिष्ठ बालगृह उंब्रज, अपंग कल्याण व पुनर्वसन संस्था दहिवडीचे रेवणसिद्ध वरिष्ठ बालगृह कोरेगाव, फिनिक्‍स संघटनेचे वरिष्ठ बालगृह वडूज यांना ‘ड’ वर्ग मिळाला असल्याने मान्यता रद्द केली आहे.

बालगृहांच्या श्रेणी
‘अ’ वर्ग- १२   ‘ब’ वर्ग- ८    ‘क’ वर्ग- ४     ‘ड’ वर्ग- ५
बालगृहातील विद्यार्थी - २१६

Web Title: satara news nine childhood permission cancel