वह्या, पुस्तके, गणवेश खरेदीत सक्ती

सिद्धार्थ लाटकर
गुरुवार, 8 जून 2017

शाळांकडून दिली जाते चिठ्ठी; भरारी पथकांना सापडत नाहीत ‘नामवंत’ शाळा  

सातारा - नव्या शैक्षणिक सत्राचा प्रारंभ येत्या १५ जूनला होत असून, त्या पार्श्‍वभूमीवर येथील बहुतांश खासगी शाळांनी गणवेश व शैक्षणिक साहित्य कोठून खरेदी करावे, याच्या सूचना पालकांना देण्यास प्रारंभ केला आहे. शिक्षण क्षेत्रात चाललेल्या या व्यावसायिक उलाढाली बंद व्हाव्यात, यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा डंका मंत्र्यांकडून वेळोवेळी वाजवला जातो; पण कनिष्ठ स्तरावर त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे त्याचा आवाज फुसका ठरत आहे.

येत्या १५ जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांची शालेय तयारी करण्याची धांदल सुरू झाली आहे. बाजारपेठेतही शालेय साहित्य विक्रीची दुकाने वैविध्यपूर्ण साहित्यांनी सज्ज झाली आहेत. मुलांना वह्या, पुस्तके, गणवेश, अन्य स्टेशनरी घेण्यासाठी पालक बाजारपेठेत गर्दी करू लागले आहेत. बहुतांश मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांनी शालेय साहित्य विशिष्ट दुकानातून घ्यावे, अशा सूचना पालकांना केल्याने संबंधित दुकानांमध्ये गर्दी दिसत आहे. काही शाळांनी पालकांच्या सोयीसाठी इयत्तेनुसार चिठ्ठीद्वारे पुस्तके कोणत्या दुकानातून, कोणत्या वेळेला, कोणत्या दिवशी घ्यावीत, याची सूचना केलेली आहे. यामुळे संबंधित दुकानांमध्ये जाऊन केवळ विद्यार्थ्याचे नाव सांगितले की लगोलग बांधून ठेवलेला गठ्ठा मिळतो. शिक्षण विभागाने अशा प्रकारचा धंदा बंद करण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केलेली आहे. परंतु, ‘नामवंत’ असा शिक्का लागलेल्या खासगी शाळांपर्यंत हे पथक कधी पोचत नाही हे नवलच.  

सक्ती करत नाही
दरम्यान, शालेय साहित्य कोठे मिळेल, अशी विचारपूस पालक शाळेत करतात. त्यांना आवश्‍यक माहिती दिली जाते. आम्ही कुणावरही सक्ती करत नाही, असे शहरातील मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील मुख्याध्यापकांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले. 

बाजारात वही ५० रुपयांना असेल तर आम्हाला ६० ते ६५ रुपयांना घ्यावी लागते, याचा प्रत्यय काही वर्षांपासून घेत आहोत. परंतु, मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी गप्प बसावे लागते. खरे तर ही ‘अर्थपूर्ण’ व्यवहाराची साखळी कधी मोडणार, हा प्रश्‍न अनुत्तरितच राहतो.
- एक पालक, सातारा 

आम्ही संघटनेद्वारा गरजूंना, गुणवंतांना वह्या, दप्तरे, गणवेश आदींचे वाटप करीत असतो. परंतु, गेली काही वर्षे शाळेचे नाव असलेली वही, दप्तर, ड्रेस विद्यार्थ्यांनी घ्यावा, हा संस्थांचा आदेश समाजातील सत्कार्याच्या आड येत आहे.
- बाळासाहेब महामुलकर, प्रदेश संघटक, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

Web Title: satara news notebook, book uniform compulsory purchasing in school