साताराः गावठी कट्टा विकण्याच्या उद्देशाने आलेल्या एकाला अटक

संतोष चव्हाण
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

उंब्रज (कऱ्हाड, जि. सातारा) : गावठी कट्टा विकण्याच्या उद्देशाने आलेल्या एकास पोलिसांनी आज (मंगळवार) अटक केली. येथील इंदोली फाट्यावरील ढाब्यावर छापा टाकून त्यास गावठी कट्ट्यासह अटक केली आहे. अक्षय अनिल कोरे (वय २३ रा. ब्रम्हपुरी मसूर ता. कऱ्हाड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर इंदोली फाटा येथे कारवाई झाली. तेथील ढाब्यावर पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी अक्षय कोरेस अटक केली. कोरे तेथील ढाब्यासमोर गावठी कट्टा घेऊन उभा होता. त्यावेळी त्याच्याकडून गावठी कट्टा पोलिसांनी जप्त केला.

पोलिसांनी सांगितसे की, पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांना इंदोली फाटा येथील न्यू पांचाली ढाब्यासमोर संबधित युवक गावठी कट्टा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनुसार पोलिस नाईक सतीश मयेकर, लक्ष्मण जगधने, आण्णाराव मारेकर यांनी सापळा रचला. ढाब्यावरील पार्किंगच्या समोर त्यांना एक युवक दिसला. त्यांना मिळालेल्या माहितीशी त्या युवकाचे वर्णन जुळत होते. त्यांनी त्वरीत त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याचा कमरेला गावठी कट्टा सापडला. तो कट्टा पोलिसांनी जप्त केला आहे. संशीयीत युवक अक्षय कोरेला अटक केली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
मराठ्यांनो, जातीय अस्मितेच्या विळख्यातून बाहेर पडा...
‘आई, तिला विचार तू का आलीस?’
तुरुंगातील 'व्हीआयपी' बडदास्त सीसीटीव्हीतून उघड
डोकलामप्रश्‍नी लवकरच तोडगा निघेल : गृहमंत्री
भाजप सुसाट; "राष्ट्रवादी' सपाट 
डेंगीचा आजपासून नायनाट
राज ठाकरे आज पुण्यात 
भाजपच्या भूमिकेमुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबला
तातडीचे कर्ज फक्त २४ हजार शेतकऱ्यांना
स्वाइन फ्लूचे अत्यवस्थचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात 

Web Title: satara news one arrested in umbraj