पेट्रोल दरवाढीवर ‘आउट ऑफ’चा फंडा!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

सातारा - पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे इंधन वाचवून जास्तीत जास्त अंतर जाण्यासाठी दुचाकींसह रिक्षाचालकांचे उताराने ‘आउट ऑफ’ जाणे वाढले आहे. इंधन आणि पैसे वाचविण्याच्या नादात वाहनचालक अपघातांचा मोठा धोका पत्करत आहेत. रिक्षाचालकांच्या उताराने इंजिन बंद करण्याच्या प्रकारामुळे इच्छितस्थळी पोचण्यास काहीसा उशीर होत असून, नागरिकांत खटके उडू लागले आहेत. दरम्यान, इंधन दरवाढीमुळे एसटीची भाडेवाढ करण्याचा निर्णय मंत्र्यांनी जाहीर केला आहे. एसटीची भाडेवाढ झाल्याशिवाय सर्वत्र फोफावलेल्या ‘वडाप’ सेवेला कोणी वाढवून भाडे देत नाही. त्यामुळे समस्त ‘वडाप’वाले या दरवाढीची वाट पाहात आहेत.

दिवसेंदिवस अन्नधान्य, किराणा, भाजीपाल्याची दरवाढ होत आहे. महागाईत नागरिक होरपळत असताना अत्यावश्‍यक बनलेल्या डिझेल आणि पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. इंधनाची दरवाढ ही नेहमी इतर गरजेच्या वस्तूंच्या माहागाईस काही प्रमाणात कारणीभूत ठरत असते. सध्या पेट्रोलचे प्रतिलिटर दर ८० रुपयांच्या पुढे तर डिझेलचे दर ७० रुपयांच्या पुढे गेले आहेत. याचा फटका वाहनचालकांना बसला आहे. प्रत्येक महिन्यात थोडी थोडी झालेली ही वाढ आता चांगलीच जाणवू लागली आहे. दुचाकीचा प्रवासही आता परवडेनासा झाला असल्याचे मत अनेक नागरिक व्यक्त करत आहे. या आधीच कमीतकमी इंधनात जास्तीतजास्त अंतर जाता यावे यासाठी अनेक दुचाकी चालक उताराने इंजिन बंद करून ‘आउट ऑफ’ मारत असत. आता इंधन दरवाढीने त्याचे प्रमाण वाढले आहे. थोडा जरी उतार रस्त्याला मिळाला की लगेच इंजिन बंद करून चढापर्यंत प्रवास केला जात  आहे. 

महामार्गासह, शहरात सर्वत्र सध्या ‘आउट ऑफ’ सुरू आहे. त्यात दुचाकीच नव्हे तर शहर रिक्षाचालकही इंधन वाचविण्यासाठी ‘आऊट ऑफ’मारताना दिसतात. मात्र, इंजिन बंद करून वाहन चालविण्यात मोठे धोके आहेत हे कोणीच लक्षात घेत नाही. 

एसटी अन्‌ वडाप
इंधनाची दरवाढ झाल्यामुळे राज्य परिवहन महामंडळ पुढील महिन्यात एसटीच्या तिकीट शुल्कात वाढ करणार आहे. एसटी किती वाढ करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात सर्वत्र खासगी प्रवासी वाहतुकीचे ‘वडाप’ जोरात आहे. त्यांनाही ही इंधन दरवाढ सोसेना झाली आहे. मात्र, एसटीने दरवाढ केल्याशिवाय त्यांना कोणी जादा पैसे देत नाही. त्यामुळे ते कधी एकदा दरवाढ करते आहे यावर ते टपून आहेत.

‘आउट ऑफ’चे धोके
इंजिन बंद करून उताराने वाहन चालविताना इंधन काही प्रमाणात जरूर वाचते; पण गाडीवर चालकाचे पूर्ण कंट्रोल राहत नाही. वेग जास्त वाढतो. अशा वेळी ब्रेक न लागल्यास अपघात होऊ शकतो. वाहन बंद करून उताराने पळवणे हे इंजिनलाही मारक असते. त्यातून गाडी दुरुस्तीचे काम लवकर करावे लागते.

Web Title: satara news Out of the fund for the petrol hike