तमाशातील किरकोळ वादावरून हाणामारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

कुंभारगाव व शेजारील चाळकेवाडीत मारामारी झाली. त्यात काठ्यांनी मारहाण झाली.

ढेबेवाडी (ता. पाटण, जि. सातारा) : कुंभारगाव येथे लक्ष्मी देवी यात्रेनिमित्त तमाशा होता. त्यावेळी किरकोळ वाद झाला. तो तेथे मिटला. मात्र त्याचे पर्यावसान आज (सोमवारी) मारामारीत झाले.

सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कुंभारगाव येथील मान्याचीवाडी रस्त्यावर दोन वेगवेगळ्या गावातील सुमारे दीडशे ते दोनशे लोकांच्या जमावाच्या दोन गटांत जोरदार मारामारी झाली. कुंभारगाव व शेजारील चाळकेवाडीत मारामारी झाली. त्यात काठ्यांनी मारहाण झाली. यावेळी दोन्हीकडून तुफान दगडफेक करण्यात आली. त्यात चार पोलिस जखमी झाले आहेत.

गावात तणाव पूर्ण शांतता आहे. मात्र मोटा बंदोबस्त लावण्यात आला. स्तिती नियंत्रणात अशल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही गटाकडून त्याबाबत फिर्यादी दाखल करम्याचे काम सुरू आहे. माकुंभारगाव हे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे गाव आहे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: satara news patan crime kumbhargaon yatra tamasha