कमिन्स कंपनीत जमिनी गेलेल्यांना रोजगार देण्याची मागणी

संदीप कदम
गुरुवार, 8 जून 2017

सकाळी नऊ वाजता कंपनीच्या प्रवेशद्वारावर ग्रामीण पोलिस निरिक्षक अशोक शेळके यांनी आंदोलकांची भेट घेतली व शांततेचे आवाहन केले. तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यांशी आंदोलकांच्या वतीने चर्चा करतो असे सांगितले तसेच आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. 

फलटण : सुरवडी (ता. फलटण) येथील कमिन्स कंपनीसाठी ज्यांच्या (17 प्रकल्पग्रस्त) जमिनी गेल्या त्यांना हक्काचा रोजगार मिळावा व कायम करावा या मागणीसाठी स्वराज्य संघटनेद्वारे चे जिल्हाध्यक्ष दिगंबर आगवणे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.

आज सकाळी आठ वाजता कमिन्स कंपनीचे मुख्य प्रवेशद्वार अडविले तसेच कर्मचाऱ्यांनी कंपनीत जाण्यास प्रतिबंध केला. या आंदोलनास रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनीही कंपनीच्या प्रवेशद्वारावर येऊन आंदोलनास पाठिंबा दिला. सकाळी नऊ वाजता कंपनीच्या प्रवेशद्वारावर ग्रामीण पोलिस निरिक्षक अशोक शेळके यांनी आंदोलकांची भेट घेतली व शांततेचे आवाहन केले. तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यांशी आंदोलकांच्या वतीने चर्चा करतो असे सांगितले तसेच आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. 

आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यापूढे कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी घेऊन आलेले कंपनीच्या गाड्या पुन्हा फलटणला गेल्या. सुमारे चार तासानंतर ही आंदोलक प्रवेशाद्वारावर ठिय्या मांडून बसले होते.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
तिडके, डोईफोडेचे अपराध अन् निशब्द पंकजा
पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर 19 धावांनी विजय​
#स्पर्धापरीक्षा - बुद्धिबळ : कार्लसनची जगज्जेतेपदाची हॅट्ट्रीक​
शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेले सरकार आंदोलनावरून काँग्रेस, माकपचे टीकास्त्र​
जनावरे खरेदी-विक्री निर्बंधास सर्वोच्च न्यायालयात आव्हान

Web Title: satara news phaltan cummins company land farmers strike