गर्भवती महिला सर्व्हेत अडकली आरोग्य केंद्रे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

फलटण शहर - फलटण पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडून चालविण्यात येणारी तालुक्‍यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे ही गर्भवती महिलांचा सर्व्हे आणि कुटुंब नियोजनाच्या फेरात अडकल्यामुळे याठिकाणी सामान्य रुग्ण सुविधा घेण्यास दबकतो. त्यामुळे मिळणाऱ्या सुविधांसाठी जनजागृती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

फलटण शहर - फलटण पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडून चालविण्यात येणारी तालुक्‍यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे ही गर्भवती महिलांचा सर्व्हे आणि कुटुंब नियोजनाच्या फेरात अडकल्यामुळे याठिकाणी सामान्य रुग्ण सुविधा घेण्यास दबकतो. त्यामुळे मिळणाऱ्या सुविधांसाठी जनजागृती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

तालुक्‍यातील लोकसंख्या व नागरिकांच्या सोयीनुसार माजी आमदार चिमणराव कदम यांच्या कार्यकाळात राजाळे, तरडगाव, साखरवाडी, गिरवी, बरड, बिबी याठिकाणी प्राथमिक आरोग्य केद्रांच्या सुसज्य इमारतींची उभारणी करण्यात आली. त्यानुसार आवश्‍यक सर्व सुविधा, निर्धारित डॉक्‍टरांचे संख्याबळही पुरविण्यात आले. सद्यःस्थितीला वाढती लोकसंख्या व आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी या सहा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नियंत्रणाखाली सुमारे ३५ उपकेंद्रे सुरू करण्यात आली असून, पूर्वी काम पाहणाऱ्या डॉक्‍टरांकडे त्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. वास्तवात प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ही उपकेंद्रे ५० किलोमीटरहून लांब असल्यामुळे रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांबाबत प्रश्न चिन्ह निर्माण होते. 

ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी निर्माण केलेल्या आरोग्य केंद्रांवरील डॉक्‍टर रात्रीच्या वेळी मुक्कामास नसल्याने रुग्णांची गैरसोई होत असल्याचे दिसून येते, तर काही डॉक्‍टरांच्या खासगी ‘ओपीडी’ सुरू असल्यामुळे प्राथमिक केंद्रांतून पुढील उपचार स्वमालकीच्या दवाखान्यात घेण्यास रवाना केले जाते. त्यामुळे शासकीय औषधांचा वापर अनिधिकृतपणे निश्‍चित केला जाऊ शकतो.  

आरोग्य विभागाकडे असलेल्या उपलब्ध सुविधांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, तर तालुक्‍यातील भौगोलिक स्थितीच्या आधारे प्रत्येक केंद्रावरील डॉक्‍टरांची संख्या वाढविणे गरजे आहे. त्याचबरोबर किमान एक डॉक्‍टर निवासी असणे बंधनकारक करावे, अशी मागणी नागरिकांतून येत आहे.

रुग्णवाहिकांची दुर्दशा
रुग्णवाहिकांची अपुरी संख्या व सद्यःस्थितीला सेवेत असलेल्या रुग्णवाहिकांची झालेली दुर्दशा यामुळे गंभीर रुग्णांना तालुक्‍याच्या ठिकाणी तातडीने पोचविणे अशक्‍य होत असून, या बाबीकडे प्राधान्याने पाहणे गरजेचे आहे.

Web Title: satara news phaltan health