फलटणमध्ये राष्ट्रवादीचा हल्लाबोल

फलटणमध्ये राष्ट्रवादीचा हल्लाबोल

फलटण - राज्यासह केंद्रातील सरकार हे शेतकरी व सामान्य लोकांच्या हिताला नुकसान पोचवणारे आहे. शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्यासह सहकार क्षेत्र उद्‌ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले आहे. शासनाची धोरणे शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करणारी असल्याने त्यांच्या विरोधी सर्वांनी आवाज उठवून शासनाच्या कार्यपद्धतीविरोधात उठलेला वणवा राज्यभर पेटवावा, असे आवाहन आमदार दीपक चव्हाण यांनी केले. 

येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शासनाच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, नगराध्यक्षा नीता नेवसे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, पंचायत समितीचे उपसभापती शिवरुपराजे खर्डेकर, जिल्हा परिषद सदस्य दत्ता अनपट, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विलासराव नलवडे, शहराध्यक्ष मिलिंद नेवसे, नगरसेवक अजय माळवे, जगन्नाथ कुंभार, राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्षा राजश्री शिंदे, प्रा. भीमदेव बुरुंगले, डॉ. बाळासाहेब शेंडे उपस्थित होते. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, सात- बारा कोरा करावा, शेती उत्पादनाला हमीभाव मिळाला पाहिजे, गुजरातच्या धर्तीवर कापसाला हमीभावावर ५०० रुपये प्रतिक्‍विंटल बोनस द्यावा, भाकड जनावरे प्रती जनावर २५ हजार रुपये किंवा भाकड जनावर सांभाळण्यासाठी प्रत्येक जनावरामागे ६० रुपयेप्रमाणे पशुखाद्य खर्च शेतकऱ्यांना द्यावा, गाईच्या दुधाला ३० रुपये प्रतिलिटर व म्हशीच्या दुधाला ५० रुपये प्रतिलिटर दूध दर जाहीर करावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. शासनाच्या कार्यपद्धती व धोरणावर आमदार चव्हाण यांच्यासह सुभाष शिंदे व संजीवराजे यांनी टीका केली. या वेळी तहसीलदार विजय पाटील यांना मागण्यांचे निवेदन  देण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com