प्लॅस्टिक बंदीचे स्वागत अन्‌ चिमटेही! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

सातारा - राज्य शासनाच्या प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाचे पडसाद जनमाणसाबरोबरच सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात उमटताना दिसत आहेत. काहींकडून या निर्णयाचे स्वागत होत असतानाच काहींनी शासनाच्या निर्णयावर चिमटे काढत आपला राग व्यक्त केला आहे. 

सातारा - राज्य शासनाच्या प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाचे पडसाद जनमाणसाबरोबरच सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात उमटताना दिसत आहेत. काहींकडून या निर्णयाचे स्वागत होत असतानाच काहींनी शासनाच्या निर्णयावर चिमटे काढत आपला राग व्यक्त केला आहे. 

राज्यात शनिवारपासून (ता. 23) शासनाने प्लॅस्टिक बंदी केली आहे. प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीची जबाबदारी महापालिका, नगरपालिका प्रशासन, जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी व ग्रामसेवकांवर देण्यात आली आहे. येत्या तीन महिन्यांत संपूर्ण राज्य प्लॅस्टिकमुक्त करण्याचा निर्धार शासनाने केला आहे. प्लॅस्टिक बंदीचा निर्णयावर जनमाणसात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. सोशल मीडियावरही त्याचे पडसाद उमटताना दिसतात. काहींकडून या निर्णयाचे स्वागत केले जात असताना काहींनी खिल्लीही उडवली आहे. या प्रतिक्रियांतून खुमासदार विनोदही केले जात आहेत. त्यातून नागरिकांचे चांगलेच मनोरंजन होताना दिसते. 

नवीन धमकी.. 
तू नुस्ता गाडी पार्क कर... 
नाही तुझ्या हॅण्डलला 
कॅरीबॅग अडकवली तर बघ... 

 

कोणी पाच हजार रुपये दंड मागितला तर त्याला सांगा... 
सरकारने दिलेल्या 15 लाखांमधून कापून घे... 

 

प्लॅस्टिक बंदीला विरोध न्हाय... 
पण, मटण आणायला कुकर घेऊन जायचं का? 

बरं झालं... 
प्लॅस्टिकबरोबर काचेवर बंदी नाही आली... 
नाही तर दारूच्या दुकानांवर तांब्या घेऊन जायला लागलं असतं. 

काय बाई ह्यांचं रोजचं नाटक... 
आधी तांदळाच्या डब्यातल्या नोटा काढायला लावल्या, 
आता गादीखालच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या... 

डिअर ऑल... 
काही अपरिहार्य कारणांमुळे तुमच्या सगळ्यांपासून दूर जात आहे. अनेक वर्षांपासून आपण एकत्र आहोत. पण, आयुष्यात असे प्रसंग येतात की, आपल्याला एकमेकांपासून दूर जाणं भाग पडतं. 
वाटत नाही की मी परत येईन. भविष्यात कधी चुकून भेट झालीच तर मला ओळख दाखवा. आजपर्यंत तुम्ही मला प्रेम दिले त्याबद्दल धन्यवाद... 
तुमची लाडकी... 
प्लॅस्टिकची पिशवी 

 

Web Title: satara news plasticban social media