पोलिसास धक्काबुक्कीप्रकरणी साताऱ्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

सातारा - दुचाकी क्रेनने उचलून नेल्याची कारवाई केल्याच्या रागातून पोलिस हवालदारास धक्काबुक्की करून शिवीगाळ केली व शासकीय कामात अडथळा आणल्यावरून शहर पोलिसांनी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. आत्माराम भैरू हिरवे (वय 58, रा. शाहूनगर) असे संशयिताचे नाव आहे. त्याने वाहतूक शाखेतील हवालदार सुरेश श्रीरंग शिंदे (वय 47) यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बाजार समिती समोरील मंडईबाहेर हा प्रकार घडला. पोलिसांच्या माहितीनुसार, हवालदार सुरेश शिंदे यांची नेमणूक क्रेनमार्फत दुचाकींवर कारवाई करण्यासाठी आहे.

सातारा - दुचाकी क्रेनने उचलून नेल्याची कारवाई केल्याच्या रागातून पोलिस हवालदारास धक्काबुक्की करून शिवीगाळ केली व शासकीय कामात अडथळा आणल्यावरून शहर पोलिसांनी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. आत्माराम भैरू हिरवे (वय 58, रा. शाहूनगर) असे संशयिताचे नाव आहे. त्याने वाहतूक शाखेतील हवालदार सुरेश श्रीरंग शिंदे (वय 47) यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बाजार समिती समोरील मंडईबाहेर हा प्रकार घडला. पोलिसांच्या माहितीनुसार, हवालदार सुरेश शिंदे यांची नेमणूक क्रेनमार्फत दुचाकींवर कारवाई करण्यासाठी आहे. आज त्यांच्या क्रेनने बाजार समितीसमोरील मंडई बाहेरून वाहतुकीस अडथळा करणारी एक दुचाकी उचलली. त्या वेळी आत्माराम हिरवे यांनी "माझी गाडी का उचलली, मी सुभेदार आहे,' असे म्हणत क्रेनच्या गाडीचा दरवाजा उघडला. हवालदार शिंदे यांना धक्काबुक्की केली, तसेच त्यांच्या हातातील वॉकी टॉकीची वायर तोडली. माझे नातेवाईक व मुलगा पोलिस खात्यात आहेत. तुझी नोकरी घालवतो, असे म्हणून त्यांना शिवीगाळ केली. हवालदार शिंदे यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. 

Web Title: satara news police crime

टॅग्स