पोलिसांच्या ‘नियोजना’ने गोंदवल्यात कोंडी!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 डिसेंबर 2017

दहिवडी - पोलिसांच्या ढिसाळ नियोजनातून अवजड वाहनांनाही प्रवेश दिल्यामुळे गोंदवले (ता. माण) येथे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवासाठी आलेल्या भाविकांना वाहनकोंडीने मोठा मनस्ताप सहन करावा लागला. वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्याने वाहने अडकून पडली.

दहिवडी - पोलिसांच्या ढिसाळ नियोजनातून अवजड वाहनांनाही प्रवेश दिल्यामुळे गोंदवले (ता. माण) येथे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवासाठी आलेल्या भाविकांना वाहनकोंडीने मोठा मनस्ताप सहन करावा लागला. वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्याने वाहने अडकून पडली.

श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या १०४ व्या पुण्यतिथी महोत्सवासाठी आलेल्या भाविकांना यावर्षी गोंदवले- म्हसवड रोडवर वाहनकोंडीमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. सकाळी सहा ते आठपर्यंत वाहतूक कोंडी होती. ट्रक, टॅंकर, बस अशी मोठी वाहने पोलिसांनी न अडवल्याने ती वाहने व रस्ताच्या कडेला उभ्या केलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीमध्ये अजून भर पडली. अवजड वाहनांना गर्दी संपेपर्यंत प्रवेश बंद ठेवण्याची गरज होती. मात्र, पोलिसांनी केवळ बघ्याचीच भूमिका घेतल्याने भाविकांमधून पोलिसांबद्दल नाराजी व्यक्त केली जात होती. म्हसवड रोडला कुकुडवाड चौकापासून दोन्ही बाजूला रांगा लागल्या होत्या. गुलाल, फुले वाहन्याचा कार्यक्रम झाल्यानंतर महिला, आबालवृद्धांनाही त्यातून बाहेर पडणे जिकिरीचे बनले होते. त्यामुळे भाविकांचा श्वास गुदमरला. रस्त्याच्या कडेला लावलेली वाहने तास- दोन तास अडकून पडली होती. मात्र, एवढे होत असतानाही पोलिसांनी तत्परतेने वाहतूक कोंडी दूर का केली नाही असा सवाल भाविकांनी या वेळी उपस्थित केला.

कोंडीने भाविक त्रस्त 
एरवी वाहनधारकांना कारवाईचा बडगा दाखवणाऱ्या पोलिसांचे आज ढिसाळ नियोजन दिसून आले. ट्रक, टॅंकर, बस अशी अवजड वाहने खरे तर फुले वाहण्याच्या कार्यक्रमानंतर गर्दी कमी झाल्यानंतर सोडणे गरजचे होते, तसेच त्या वाहनांना दूरवरून प्रवेश बंद ठेवणे गरजेचे होते. मात्र, तसे न घडल्याने वाहतूक कोंडीने भाविक त्रस्त झाले.

Web Title: satara news police traffic Gondavale