डाळिंबाचा विमा घेण्याकडे पाठ  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

काशीळ - हवामान आधारित पीक योजनेतील डाळिंब फळपिकांसाठी विमा घेण्याचा शेतकऱ्यांचा कल कमी होऊ लागला आहे. जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत ३३३ शेतकऱ्यांनी विम्याकडे पाठ फिरवली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.   

काशीळ - हवामान आधारित पीक योजनेतील डाळिंब फळपिकांसाठी विमा घेण्याचा शेतकऱ्यांचा कल कमी होऊ लागला आहे. जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत ३३३ शेतकऱ्यांनी विम्याकडे पाठ फिरवली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.   

फळपिकांचे प्रतिकूल हवामान, घटकांपासून कमी-जास्त पाऊस, पावसाचा खंड, सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्‍यापासून नुकसान होऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे होणारे नुकसान भरून निघावे यासाठी या योजनेंतर्गत हवामान आधारित फळपीक विमा योजनेत डाळिंब फळपिकाचा समावेश केला आहे. यावर्षीची विमा घेण्याची मुदत १४ जुलैला संपली आहे. जिल्ह्यातील अनेक डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा यावर्षी विमा भरण्याचा कल कमी झाला असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यातील एक हजार ९६३ शेतकऱ्यांनी दोन कोटी ३५ लाख ९९ हजार ५९० रुपये विमा हप्ता भरला होता. यावर्षी मात्र एक हजार ६३० शेतकऱ्यांनी ५१ लाख ५९ हजार ६७७ विमा हप्ता भरला आहे. 

गतवर्षीच्या तुलनेत ३३३ शेतकऱ्यांनी विम्याकडे पाठ फिरवली आहे. बॅंकांत सर्वाधिक सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेस शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. 

जिल्ह्यात माण, खटाव, फलटण, खंडाळा व कोरेगाव तालुक्‍यांत डाळिंब फळपीक घेतले जाते. यातील काही तालुक्‍यांत पावसाने अजूनही ओढ दिली असल्याने पाण्याची टंचाई भासत आहे. विम्यासाठी हेक्‍टरी साडेपाच हजार रुपये विमा हप्ता भरावा लागला होता. विमा कंपन्यांकडून मिळणारी भरपाई वेळेत येत नसल्यामुळे तसेच डाळिंबाच्या दरातील सुरू असलेली घसरण यामुळे विमा घेण्याकडे कल कमी झाला असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: satara news Pomegranate insurance

टॅग्स