कोयना धरणाच्या साठ्यात विक्रमी 24 टीएमसीने वाढ

सचिन शिंदे
मंगळवार, 11 जुलै 2017

मागील वर्षापेक्षा यंदा 6.33 टिएमसी पाणीसाठा जास्त आहे. त्यामुळे वीज निर्मितीत कोणतीच अडचण नाही, असे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. कोयना धरण परिसरात 21 जुनपासून पाऊस झाला. त्याचा जोर दोन जुलै अखेर कायम टिकून होता. त्या कालवधीत सुमारे एक हजार मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद धरण व्यवस्थापमनाकडे झाली आहे.

कऱ्हाड - महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना धरणाच्या कॅचमेंट क्षेत्रात मागील दहा दिवसात झालेल्या पावासाने पाणी साठ्यात मुबलक वाढ झाली आहे. एक जुलैअखेर दहा दिवासात तब्बल एक हजार मिलीमीटर पाऊस झाल्याने कोयनेच्या धरणाच्या पाणी साठ्य़ात विक्रमी 24 टिमएसी पाणी वाढल्याची नोंद धरण व्यवस्थापनाकडे झाली आहे.

मागील वर्षापेक्षा यंदा 6.33 टिएमसी पाणीसाठा जास्त आहे. त्यामुळे वीज निर्मितीत कोणतीच अडचण नाही, असे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. कोयना धरण परिसरात 21 जुनपासून पाऊस झाला. त्याचा जोर दोन जुलै अखेर कायम टिकून होता. त्या कालवधीत सुमारे एक हजार मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद धरण व्यवस्थापमनाकडे झाली आहे. 21 जून पूर्वी कोयना धरण केवळ 14 टिएमसी पाणी होते. मात्र त्यानंतर सलग झालेल्या पावसाने त्या पाण्याच्या पातळीत विक्रमी वाढ झाली. दोन जुलै अखेर धरणाची पाणी पातळी २४ टिएमसी अशा विक्रमीने वाढली. त्यामुळे पाणी साठा 14 वरून थेट 38.17 टिएमसीव एवडा वाढला.

याच दिवसात मागील वर्षी 2016 मध्ये सुमारे 31.84 टिएमसी पाणी साठा होता. यंदा त्या साट्यात 6.33 टिएमीसने वाढ जाली आहे. त्यामुळे पावासाने ओढ दिली असूनही कोयनेच्या वीज निर्मीतीत कोणतीही अडचण येणार नाही, असे धरण व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. दोन जुलै नंतर अकरा जुलै अखेर सुमारे तचारशे मिलीमीटर पाऊस जाला आङे. कोयना भागात दररोज किमान पंधार ते वीस मिलीटर पाऊस थांबून थांबून पडतो आहे. कोयना धरमात सध्या 38.17 टिएमसी पाणी साठा पाण्याची लेवल 2091 फूट आहे.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: Satara news railfall in Koyna Dam