सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार

विकास जाधव
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

महाबळेश्वर तालुक्‍यात अनेक भागात दमदार पाऊस सुरू असल्याने स्ट्रॉबेरी लागवडीवर परिणाम होणार आहे. भात पिकांस हा फायदेशीर ठरत आहे. मात्र पहिल्या टप्प्यात पेरणी झालेल्या सोयाबीन, घेवडा या पिकांत पाणी साचल्याने पिके कुजण्याची शक्‍यता असल्याची शेतकऱ्यांनी नमूद केले.

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावली, पाटण, कऱ्हाड, वाई या तालुक्‍यात सोमवार (ता. 18) रात्रीपासून पावसाचा जोर आहे. जिल्ह्यात आज (मंगळवार) सकाळी आठ पर्यत 19.01 मिलीमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे. 

महाबळेश्वर तालुक्‍यात अनेक भागात दमदार पाऊस सुरू असल्याने स्ट्रॉबेरी लागवडीवर परिणाम होणार आहे. भात पिकांस हा फायदेशीर ठरत आहे. मात्र पहिल्या टप्प्यात पेरणी झालेल्या सोयाबीन, घेवडा या पिकांत पाणी साचल्याने पिके कुजण्याची शक्‍यता असल्याची शेतकऱ्यांनी नमूद केले. आज (मंगळवार) सकाळपासून संततधार पाऊस सुरू होता. पावसामुळे सातारा शहरातील जनजीवनावर परिणाम झाला आहे.

तालुका निहाय पाऊस मिलिमीटरमध्ये 
सातारा 08.08, जावली 33.03, पाटण 30.06, कऱ्हाड 15.04, कोरेगाव 05.02, खटाव 04.00, माण 02.01, फलटण 00.00, खंडाळा 07.04, वाई 17.07, महाबळेश्वर 85.08. 

Web Title: Satara news rain in Satara