कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला

सचिन शिंदे
सोमवार, 31 जुलै 2017

काल सकाळी अकराच्या सुमारास धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडले. मात्र त्यानंतर त्या भागात पावसाचे प्रमाण घटले आहे. बारा तासात कोयनेला केवळ नऊ, नवजाला वीस तर महाबळेश्वरला २१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

कऱ्हाड : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस चोवीस तासात ओसरला आहे.

काल सकाळी अकराच्या सुमारास धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडले. मात्र त्यानंतर त्या भागात पावसाचे प्रमाण घटले आहे. बारा तासात कोयनेला केवळ नऊ, नवजाला वीस तर महाबळेश्वरला २१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्या स्थीतीचा अभ्यास करून कोयनेचे दरवाजे दुपारनंतर एक फुटाने कमी करण्याचा विचार धरण व्यवस्थापन करत आहे.

काल दोन फुटाने उघडलेल्या दरवाजातून नऊ हजार ३३६ क्युसेक पाण्याचा विसर्गास सुरुवात केला आहे. पायथ वीज गृहातून दोन हजार १३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दोन्ही मिळून ११ हजार ७९२ क्युसेक पाणी नदीत मिसळत आहे. त्यामुळे पाटणसह कऱ्हाड तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना धरणातील पाणीसाठा ८२.२८ टीएमसी आहे. धरणाचे  पाणी पातळी २१४४.१० फूट आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: satara news rainfall in koyna dam area