'फुले दांपत्यास भारतरत्नसाठी पाठपुरावा करणार'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

खंडाळा  - महात्मा फुले व सावित्रीबाई फुले दांपत्यास भारतरत्न पुरस्कार मिळायलाच हवा. यासाठी राज्य सरकार पुन्हा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. यासंदर्भात वर्षभरात सकारात्मक निर्णय आपल्याला मिळेल, अशी माहिती जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी स्पष्ट केले. मुलींसाठी शैक्षणिक संकुलासाठी प्रयत्न करणार असून, सध्या प्रस्तावित विकासकामांसाठी एक कोटीचा निधी वर्ग केला आहे. सिमेंट बंधारे उभे करण्यासाठीही निधी देणार असल्याचे जाहीर केले. नायगाव (ता. खंडाळा) येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. 

याप्रसंगी पशुसंवर्धन व मस्त्यविकासमंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, आमदार पंकज भुजबळ, मकरंद पाटील, योगेश टिळेकर, जयकुमार गोरे, मनीषा चौधरी, बापूसाहेब भुजबळ, कमल ढोले- पाटील, कृष्णकांत कुदळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, मनोज पवार, राजेश पाटील, वनिता गोरे प्रमुख म्हणून उपस्थित होत्या. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर अध्यक्षस्थानी होते. 

रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, ""फुले दांपत्याला भारतरत्न मिळायला हवा ही मागणी योग्यच आहे. फुले दांपत्याच्या विचार कालातीत असून, त्यांच्या विचाराची पारायणे करण्याची जरुरी आहे.'' सध्या कोरेगाव भीमा येथील घडलेली घटना पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही, असेही त्यांनी नमूद केले. 

मुलगा व मुलगी हे दोन्हीही वंशाचे दिवे आहेत, असे समजून आपली मानसिकता बदलायला हवी. विधवा व परितक्‍त्या अशा वंचित महिलांसाठी आधार केंद्र नायगाव येथे उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री शिवतारे यांनी सांगितले. 

श्री. जानकर, आमदार पंकज भुजबळ, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, योगेश टिळेकर, कल्याण आखाडे व कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत यांचीही भाषणे झाली. सरपंच निखिल झगडे यांनी अहल्याबाई होळकर यांच्याप्रमाणेच भव्यदिव्य सावित्री सृष्टी नायगाव येथे उभारावी, अशी मागणी केली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी प्रास्ताविक केले. नितीन भरगुडे-पाटील यांनी आभार मानले. 

याप्रसंगी सभापती मकरंद मोटे, आदेश जमदाडे, राजेंद्र नेवसे, विविध गावचे सरपंच, महिला उपस्थित होत्या. 

महिलांनो, सावित्रीबाई बना... 
सावित्रीबाईंचे जन्मगाव माझ्यासाठी प्रेरणास्थान राहिल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल म्हणाल्या, ""फुले दांपत्याने शिक्षणाची दारे खुली करून दिली. महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्याप्रमाणे बनावे. त्यांचा शिक्षणाचा वारसा घेऊन आपल्या मुलींना शिक्षित करावे. मुली शिकल्यास पूर्ण कुटुंब शिक्षित होते. महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून कौशल्य विकास करून आर्थिक प्रगती करावी.'' महिलांना कोणी अधिकार देणार नाहीत. त्यांनी स्वत- आपले हक्क मिळवले पाहिजेत, असे सांगितले. त्यांच्या या वाक्‍याला महिलांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

Web Title: satara news ram shinde savitribai phule